पुणे ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणानंतर हृदयाचे ठोके चुकवणारा अपघात, हलक्या काळजाच्या लोकांनी Video पाहू नका

Rajasthan Accident CCTV Video : धौलपूरच्या बसाईनवाब येथील मनिया रोडवर रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला भरधाव कारने धडक दिली, त्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

सौरभ तळेकर | Updated: May 26, 2024, 04:03 PM IST
पुणे ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणानंतर हृदयाचे ठोके चुकवणारा अपघात, हलक्या काळजाच्या लोकांनी Video पाहू नका title=
Rajasthan Accident CCTV Video

Rajasthan Accident Video : संपूर्ण देशात खळबळ उडविणाऱ्या पुण्यातील पोर्शे कार अपघातात (Pune Accident) मध्य प्रदेशातील जबलपूर येथील दोन आयटी इंजिनिअरचा मृत्यू झाला. पुण्यातच नव्हे तर देशातील नागरिक या घटनेच्या निषेधार्थ पुढे आले अन् बेभान कार चालविणाऱ्या बिल्डरपुत्रावर नागरिकांच्या दबावामुळे कारवाई देखील झाली. पुण्यातील घटना ताजी असताना आता राजस्थानच्या बसाईनवाब शहरातील मनिया मार्गावर (Rajasthan Accident) भरधाव वेगात आलेल्या कारने रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्याचा सीसीसीव्ही व्हिडीओ (CCTV Video) समोर आला असून तुमच्या देखील अंगावर काटा येईल.

कारच्या धडकेमुळे हा तरुण अखाद्या चित्रपटाच्या शूटिंगप्रमाणे हवेत सुमारे 20 फूट उडी मारून रस्त्याच्या कडेला पडला. भरधाव कारच्या अपघातामुळे युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्या पद्धतीने एखादी कार एखाद्या वाहनाला धडकताना दिसते ते फिल्मी स्टाईल दिसत असलं तरी अगदी हृदय पिळवटून टाकणारं दृश्य आहे. त्यामुळे हलक्या काळजाच्या लोकांनी हा व्हिडीओ पाहू नये. 

कारच्या धडकेमुळे रस्ता क्रॉस करणारा तरुण सुमारे 20 फुटांपर्यंत उडी मारताना दिसतोय. जखमी तरुणावर जयपूरच्या एसएमएस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. जिल्ह्यातील नागला हरलाल गावातील रहिवासी दरब सिंह गेल्या बुधवारी पायीच आपल्या घरी येत होता. पोलिस सध्या कार चालकाचा शोध घेत असून योग्य कारवाई केली जाईल, असं आश्वासन देखील पोलिसांनी दिलंय.

पाहा Video

दरम्यान, घटनेनंतर कारचालकाने घाबरला अन् धूम ठोकली. आजूबाजूच्या लोकांनी तरुणाला रुग्णालयात भरती केलं. सध्या सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिस आरोपीच्या कारचा नंबर शोधत आहे आणि कार कोणत्या दिशेने गेली? याचा शोध देखील घेतला जातोय. आरोपीला कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी देखील सध्या होताना दिसतेय.