राजस्थानमध्ये राजकीय भूकंप! सचिन पायलट यांच्या बंडानंतर व्हिप जाहीर

सचिन पायलट यांच्या बंडखोरीनंतर काँग्रेस राजस्थानमध्ये सरकार वाचवण्यासाठी प्रयत्नात 

Updated: Jul 13, 2020, 08:01 AM IST
राजस्थानमध्ये राजकीय भूकंप! सचिन पायलट यांच्या बंडानंतर व्हिप जाहीर  title=

नवी दिल्ली : सचिन पायलट यांच्या बंडखोरीनंतर काँग्रेस राजस्थानमध्ये सरकार वाचवण्यासाठी प्रयत्नात आहे. काँग्रेसने १०९ आमदारांचे समर्थनाचे पत्र असल्याचा दावा केला आहे. काँग्रेस आमदरांच्या आजच्या बैठकीत व्हिप जारी केलं जाणार आहे. या बैठकीत सचिन पायलट सहभागी होणार नसून त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे. 

काँग्रेसला रविवारी रात्री अडीच वाजता पत्रकार परिषद घेतली यावरून तुम्हाला राजस्थानच्या राजकारणावर किती मोठं संकट आलंय याची जाणीव झाली असेल. दिल्लीतून जयपुरला गेलेल्या काँग्रेस तीन मोठ्या नेत्यांनी १०९ आमदरांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. यामध्ये वरिष्ठ नेता रणदीप सुरजेवाला, अजय माकन आणि अविनाश पांडे या तीन नेत्यांचा समावेश आहे. 

राजस्थानचे बंडखोर उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी दावा केला आहे की, गहलोत सरकार अल्पमतात आहे. आपल्याला ३० आमदारांचे समर्थन असल्याचा दावा सचिन पायलट याने केला आहे. दिल्लीत असूनही सचिन पायलट काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीला गेले नाहीत. 

p>मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांच्या कार्यालयात फोन करून त्यांच्याशी संवाद साधल्याचा दावा केला आहे. तसेच ते म्हणाले की, लवकरच ही परिस्थिती बदलणार आहे. सचिन पायलट यांच्या समर्थकांनी काँग्रेस नेता अहमद पटेल यांची भेट घेतली. सचिन पायलट यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी ३० मिनिटे संवाद साधला. 

 

सोमवारी सकाळी १०.३० वाजता काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडेल. यानंतर काँग्रेसकडून व्हीप जारी केला जाऊ शकतो. दरम्यान काँग्रेसचे सर्व आमदार माझ्या संपर्कात आहेत. सरकार पूर्णपणे स्थिर असून पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा काँग्रेसचे सरचिटणीस आणि राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनी केला.