राजस्थानमध्ये भीषण दुर्घटना, १७ जण जखमी

या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. 

Updated: Jul 29, 2018, 08:30 PM IST
राजस्थानमध्ये भीषण दुर्घटना, १७ जण जखमी title=

जयपूर: राजस्थानातील श्रीगंगानगरमध्ये रविवारी ट्रॅक्टर स्पर्धेदरम्यान भीषण अपघात झाला. प्रेक्षकांनी खच्चून भरलेला मंच अचानक कोसळला. या दुर्घटनेत १७ जण जखमी झाले असून यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

पदमपुरा येथील धानमंडीमध्ये ट्रॅक्टरची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.  स्पर्धा पाहण्यासाठी मंच उभारण्यात आले होते. यातील सात नंबरच्या मंचावर प्रेक्षकांनी गर्दी केली. अचानक हा मंच कोसळला. प्रशासनाच्या रीतसर परवानगीशिवाय या ट्रॅक्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.