Crocodile Attack On Young Man Trending News: आपल्या आसपास रोज कोणत्या कोणत्या घटना घडत असतात. काही घटनांबाबत ऐकलं की आश्चर्य वाटतं. कधी कधी आपण स्वत: त्या घटनांचे साक्षीदार असतो. त्यामुळे आपण जेव्हा ती घटना इतरांना सांगतो तेव्हा ऐकणाऱ्यांचा देखील विश्वास बसत नाही. अशीच एक घटना राजस्थानातील (Rajasthan) बूंदीच्या केशोरायपाटन विधानसभा क्षेत्रात घडली आहे. कापरेन भागातील रोटेदा गावातील ही घटना आहे. या गावातला तरुण आंघोळीसाठी चंबल नदीवर (Chambal River) गेला होता. नदीत उडी घेतल्याबरोबर मगरीने त्याच्यावर हल्ला (Crocodile Attack) केला. त्यामुळे त्याच्या उजव्या पायाला जखम झाली. जवळपास 7 मिनिटं मगरीसोबत त्याने संघर्ष केला. अखेर मृत्यू तोंडाशी असताना केलेल्या संघार्षात तरुणाला यश आलं. जखमी तरुणाने झटापटीत मगरीच्या डोळ्यांवर हल्ला केला आणि पाण्यातून बाहेर निघाल. त्यानंतर त्याला कापरेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
रोटेदा गावातील 17 वर्षीय दीपक केवट दुपारी तीन वाजता ब्रह्मानंद चंबल नदी घाटावर आंघोळीसाठी गेला होता. किनाऱ्यावर बसून कपडे धुवत होता. या दरम्यान पाण्यातून मगरीने त्याच्यावर हल्ला केला. दीपकचा पाय पकडून पाण्यात खेचलं. पण इतकं होऊनही दीपकनं हार पत्कारली नाही आणि संघर्ष केला. पाण्यात मगरीच्या डोळ्यावर हल्ला करत राहीला.
Nose Transplant: हातावर 'उगवलं' नाक आणि नंतर केलं ट्रान्सप्लांट, का आणि कसं ते वाचा
दीपकचा आरडाओरड आणि संघर्ष पाहून जवळ असलेल्या चार जणांनी वाचवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर मगरीने सोडलं आणि तो सुखरुपरित्या बाहेर आला. पण उजव्या पायाला जबर जखमी झाली होती आणि रक्तप्रवाह सुरु होता. त्यानंतर गावकऱ्यांनी त्याला उपचारासाठी कापरेन रुग्णालयात दाखल केलं आहे. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.