Viral News : 'या' म्हशीची इंटरनेटवर जोरदार चर्चा, जाणून घ्या प्रकरण

Buffalo died :  सोशल मीडियावर एका म्हशीची (buffalo) सर्वत्र चर्चा होते आहे.   

Updated: Nov 15, 2022, 03:16 PM IST

Buffalo_died

MLA helicopter Buffalo died : सोशल मीडिया (Social media) हा असा प्लॅटफॉर्म आहे जिथे एखादी बातमी, एखादा फोटो (Photo) असो किंवा व्हिडीओ (Video) क्षणात तो व्हायरल (Viral) होतो.सध्या या सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगली आहे. ते ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. सोशल मीडिया कोणा मुलीची किंवा कुठल्या व्हायरल व्हिडीओची चर्चा नाही बरं का...ही चर्चा आहे एका म्हशीची. हो अगदी बरोबर सोशल मीडियावर एका म्हशीची (buffalo) सर्वत्र चर्चा होते आहे. 

काय आहे नेमकी भानगड

शेतकऱ्यांसाठी (farmer) त्यांची जमीन आणि पाळीव प्राणी बकरी (goat), कोंबडी (Chicken), गाय (cow), म्हशी अतिशय प्रिय असतात. जर अशावेळी दुसऱ्यांच्या चुकीमुळे जर या पाळीव प्राण्यांना काही झालं तर मग शेतकऱ्यांचा संताप बघायला नको. झालं असं की, गावातून एकेदिवशी अचानक हेलिकॉप्टर (helicopter) गेलं. या हेलिकॉप्टरच्या आवाजामुळे एका शेतकऱ्याच्या म्हशीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांनी थेट पोलीस (Police) स्टेशन गाठतं तक्रार दाखल केली आहे. शेतकऱ्यांने संतापच्या भरात पोलिसांना एक पत्रच लिहिलं आणि हे पत्र सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ (letter viral on social media) घालतं आहे. (trending news MLA helicopter Buffalo died Farmer letter viral on Social media nmp)

इंटरनेटवर (internet) बस्स एकच चर्चा

या शेतकऱ्यांच्या घरावरुन एक हेलिकॉप्टर गेला आणि त्याचा आवाजाने म्हैस बिथरली. ती इतकी घाबरली की प्रचंड घाबरली आणि तिला हृदयविकाराचा झटकामुळे (heart attack) मृत्यू झाल्याचा दावा शेतकऱ्यानं केला आहे. दरम्यान याबद्दल कुठलाही पुरावा नाही. सगळ्यात मोठ्या गौप्यस्फोट म्हणजे ते हेलिकॉप्टर दुसरं तिसरं कोणाचं नसून एका आमदाराचं आहे.त्यामुळे एका आमदाराच्या हेलिकॉप्टरमुळे म्हशीचा मृत्यू झाल्याचा शेतकरी दावा करत आहे. एवढंच नाही तर सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येतं आहे. 

Buffalo_died_1

कधी घडली घटना

ही घटना राजस्थानमधील (Rajasthan) बहरोडमध्ये घडली आहे. आमदार Baljeet Yadav यांनी जिल्ह्यात मतदारांना प्रभावित करण्यासाठी चक्क आकाशातून फुलांचा वर्षाव केला. गावावरून हेलिकॉप्टर फिरवत लोकांच्या घरांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्यावेळी ही घटना घडली.