Rakesh Jhunjhunwala यांच्या नव्या एअरलाइन Akasa Air ला नागरिक विमान मंत्रालय आणि DGCA कडून हिरवा कंदील : रिपोर्ट

नव्या एअरलाइन Akasa Air साल 2021 पर्यंत साकारणार 

Updated: Aug 5, 2021, 07:31 AM IST
Rakesh Jhunjhunwala यांच्या नव्या एअरलाइन Akasa Air ला नागरिक विमान मंत्रालय आणि DGCA कडून हिरवा कंदील : रिपोर्ट title=

मुंबई : भारतीय बिझनेस मॅग्नेट आणि स्टॉक मार्केट इनवेस्टर राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala)यांनी प्रमोट केलेल्या Akasa एअरलाइन (Akasa Air) ला नागरिक उड्डान मंत्रालय आणि DGCA कडून हिरवा कंदील मिळाला आहे. यांनी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजे NOC दिलं आहे. (Rakesh Jhunjhunwala promoted Airline Akasa Air gets NOC From Ministry of Civil Aviation and DGCA) 4 ऑगस्ट म्हणजे बुधवारी याबाबत माहिती मिळाली आहे. Akasa Air हे 2021च्या शेवटापर्यंत ऑपरेशन सुरू करण्याच मानस आहे. 

रिपोर्टनुसार, Akasa Air नॅरो बॉडी एअरक्राफ्टच्या बोइंग फ्लीटला निवडण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. आशा आहे की, एअर ऑपरेटर परमिट विमान अधिग्रहणानंतर मिळेल. 

या अगोदर 28 जुलै रोजी रिपोर्टमध्ये समोर आलं होतं की, झुनझुनवाला चार वर्षांत एका नव्या एअरलाइन्स वेंचरमध्ये 70 विमान ठेवण्याची योजना आखत होती. ती योजना मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. झुनझुनवाला यांच्याकडे नव्या एअरलाइनचे जवळपास 40 टक्के हिस्सेदारी आहे. या वेंचकमध्ये 35 मिलियन डॉलरची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एअरलाइन इंडिगोचे माजी अध्यक्ष आदित्य घोष झुनझुनवाला आणि जेट एअरवेजचे माजी CEO विनय दुबे यांच्यासोबत Akasa चे सह-संस्थापक असणार आहेत. या नव्या अल्ट्रा-लो-कॉस्ट कॅरिअर (ULCC) सोबत घोष एविएशन इंडस्ट्रीत पुनरागमन करणार. 2018 मध्ये इंडिगोचे अध्यक्ष आणि हॉल टाइम डायरेक्टर पद सोडून इंडस्ट्रीमधून बाहेर झाले. आता ते फॅब इंडिया आणि Oyo रूम्सचे बोर्ड सदस्य आहेत. 

Akasa च्या दुसऱ्या प्रमुख पदाकरता जेट एअरवेजचे माजी वीपी प्रवीण अय्यर COO ची जबाबदारी सांभाळणार.