नवी दिल्ली : राजकीयदृष्ट्या संवेदनशील रामजन्मभूमी प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुरुवातीलाच हा खटला राजकीय नसून जमिनीचा आहे असं सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलंय.
सर्वोच्च न्यायालयानं आज राम जन्मभूमी बाबरी मशीदी प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आलेल्या 14 अपीलांवरची सुनावणी १४ मार्चपर्यंत पुढे ढकलली. सर्व पक्षांना दस्तावेज तयार करण्यासाठी सुप्रीम कोर्टानं दोन आठवड्यांचा वेळ दिलाय.
चीफ जस्टिस दीपक मिश्रा, जस्टिस अशोक भूषण आणि जस्टिस अब्दुल नजीर यांच्या खंडपीठाणे ही सुनावणी सुरु आहे.
आज दुपारी सरन्यायाधीश दीपक मिश्रांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू झाली. या प्रकरणात आधी मुख्य याचिकाकर्त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यानंतर इतर संबंधित याचिकांवर सुनावणी होईल.