नवी दिल्ली : महिनाभर रोझाचे उपवास केल्यानंतर बुधवारी रमजान ईद साजरा करण्यात येत आहे. संपूर्ण देशात ईदचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या दिवसाच्या निमित्ताने सकाळपासूनच विविध ठिकाणी असणाऱ्या मशिदींमध्ये नमाज अदा करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी नमाजसाठी आलेल्या सर्वांनीच एकमेकांना मिठी मारत ईदच्या शुभेच्छाही दिल्या.
देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला ईदच्या शुभेच्छा दिल्या. हिंदी, उर्दू आणि इंग्रजी अशा भाषांमधून त्यांनी या शुभेच्छा दिल्या. 'रमजान ईदचा हा सण बंधुभाव आणि परोपकाराची भावना अधिक दृढ करतो. अशा या खास दिवशी सर्वांच्याच कुटुंबात सुख- शांती, समृद्धी आणि आनंद नांदो....', असं म्हणत त्यांनी या शुभेच्छा दिल्या.
सभी देशवासियों, खास तौर से देश और विदेश के हमारे मुस्लिम भाइयों और बहनों, को ईद मुबारक। रमज़ान के महीने के समापन का यह त्योहार परोपकार और भाईचारे की भावना में हमारे विश्वास को मजबूत बनाता है। यह शुभ दिन हम सब के परिवारों में खुशियां, शांति और समृद्धि लाए — राष्ट्रपति कोविन्द
— President of India (@rashtrapatibhvn) June 5, 2019
Maharashtra: Devotees offer namaz on the occasion of #EidUlFitr at the Hamidiya Masjid in Mumbai. pic.twitter.com/nmEUnxXGaV
— ANI (@ANI) June 5, 2019
रमजानचा महिनाभर रोझाचे उपवास केल्यानंतर या महिन्याच्या शेवटच्या दिवशी चंद्रदर्शन झाल्यानंतर ईदच्या शुभेच्छा दिल्या जातात. ईदच्या दिवसाच्या निमित्ताने मुंबई आणि महाराष्ट्रासह देशभरातील मशिदींमध्ये हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली आहे. आजच्या दिवशी मुस्लिम बांधव नातेवाईकांच्या भेटीगाठी घेत एकमेकांसोबत या दिवसाचा आनंद साजरा करतात.
People offer namaz at Delhi's Jama Masjid on #EidulFitr today. pic.twitter.com/M0LZDS4iqO
— ANI (@ANI) June 5, 2019
Bihar: People offer namaz at Gandhi Maidan in Patna on #EidUlFitr today. pic.twitter.com/h2m0dVga61
— ANI (@ANI) June 5, 2019
Jammu & Kashmir: Visuals from Eidgah in Jammu as people offer namaz on #EidUlFitr today. pic.twitter.com/uFAlcHVZDk
— ANI (@ANI) June 5, 2019
सौदी अरब आणि इतर आखाती राष्ट्रांमध्ये सोमवारी चंद्रदर्शन झालं आणि त्या ठिकाणी मंगळवारी रमजान ईदचा उत्साह पाहायला मिळाला होता. सहसा सौदी अरबमध्ये ईद साजरा झाल्यानंतर एका दिवसानेच भारतात ईदच्या शुभेच्छा दिल्या जातात. अशा या पवित्र दिवसाच्या निमित्ताने सर्वांना Zee24Taas.com तर्फे #EidUlFitr च्या खूप खूप शुभेच्छा. ईद मुबारक!