Ratan Tata | हॅलो मी रतन टाटा बोलतोय, एक फोन कॉल आणि चेतन, आदितीचं आयुष्य बदललं

रतन टाटा यांच्याबाबत आपण सर्वजण जाणून आहोत. आपण कित्येकदा त्यांना अनेकांची मदत करताना पाहिलंय. नुकताच, त्याच्या एका कॉलने आदिती आणि चेतन यांचं आयुष्याचं बदललं आहे.. जाणून घेऊयात याच इन्स्पायरिंग स्टोरीबाबत

Updated: Aug 9, 2022, 07:11 PM IST
Ratan Tata | हॅलो मी रतन टाटा बोलतोय, एक फोन कॉल आणि चेतन, आदितीचं आयुष्य बदललं title=

Ratan Tatas one call changed life of chetan and aditi, motivational story : आपल्या सर्वांना आपल्यासोबत सर्वात बेस्ट मेंटॉर असावा असं वाटतं. भारतात असे अनेक व्यावसायिक आहेत जे तरुणांच्या नवनव्या आयडीयाज प्रत्यक्षात उतरवण्यात त्यांना मदत करतात. आनंद महिंद्रा, रतन टाटा ही त्यातलीच काही नावं. आनंद महिंद्रा, रतन टाटा यांच्यासारख्या बड्या व्यावसायिकांनी आतापर्यंत अनेकांना मदत केलीये. ज्यांना ज्यांना त्यांनी मदत केलीये त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलंय. असंच काहीसं घडलंय आदिती भोसले वाळुंज आणि चेतन वाळुंज यांच्यासोबत खुद्द रतन टाटा यांचा एक कॉल आणि या दोघांचं आयुष्याचं बदललं.  

स्वतः रतन टाटांनी केलं गाईड

रतन टाटा यांना भेटण्यासाठी आदिती यांनी एक 3D प्रेझेंटेशन बनवलेलं, सोबतच एक पत्र देखील लिहिलेलं.यामध्ये त्यांनी त्यांची कंपनी रिपोस एनर्जीबाबतही विस्ताराने लिहिलेलं. बराच वेळ हे रतन टाटा यांच्या भेटीसाठी त्यांच्या घराबाहेर तातकळत थांबले देखील. मात्र भेटीसाठी वेळ न मिळाल्याने त्यांना हॉटेलवर परतावं लागलं.  

एक फोन कॉल आणि बदललं आयुष्य

रात्री दहा वाजता आदिती यांना एक फोन आला. फोनवर बोलणारे व्यक्ती होते स्वतः बिझनेस टायकून रतन टाटा. Ratan Tata यांनी स्वतः आदिती यांना पत्र मिळाल्याचं सांगितलं आणि भेटीबाबतही विचारलं. दुसरीच्या दिवशी दोघांनी रतन टाटांची भेट घेतली. त्यांची मिटिंग जवळपास 3 तास चालली. यामध्ये स्वतः रतन टाटा यांनी त्यांना या बिझनेसबाबत काय वाटतं हेही सांगितलं.  

मदत करण्यात कायम पुढाकार 

कुणालाही मदत करण्यासाठी रतन टाटा हे कायम पुढे असतात. आदिती आणि चेतन यांची कंपनी ऑरगॅनिक कचऱ्यापासून चालणाऱ्या मोबाईल इलेक्ट्रिक वाहनं बनवणारी कंपनी आहे.

Ratan tatas one phone call changed life of aaditi ani chetan motivational story SB