Home Loan चे EMI वाढले; 'या' बँकांच्या ग्राहकांना फटका

मात्र ज्यांनी गृहकर्ज (Home Loan) घेतलं आहे अशा लोकांना बँकांनी झटका दिली आहे.

Updated: Aug 9, 2022, 05:55 PM IST
Home Loan चे EMI वाढले; 'या' बँकांच्या ग्राहकांना फटका title=
hikes home loan rate know how much more emi will rise rbi repo rate hike in marathi

Hikes Home Loan Rate :  आपलं स्वतःचं, हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँका आपल्याला गृहकर्ज देऊन मदत करतात. मात्र ज्यांनी गृहकर्ज (Home Loan) घेतलं आहे अशा लोकांना बँकांनी झटका दिली आहे. कारण आरबीआयने (RBI) आपल्या रेपो रेटमध्ये (REPO Rate)वाढ केल्यामुळे गृहकर्ज महाग झाले आहेत. 

यात सर्वात अधिक फटका HDFC बँकांच्या ग्राहकांना बसला आहे. ज्यांनी HDFC बँकेतून गृहकर्ज घेतलं आहे त्यांचे EMI वाढले आहेत.  HDFC बँकेने 8 ऑगस्टपासून गृहकर्जाच्या व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. RBI  वाढवलेल्या रेपो दराचा फटका HDFC ग्राहकांना बसला आहे. (hikes home loan rate know how much more emi will rise rbi repo rate hike in marathi)

आता आपण जाणून घेऊयात कुठल्या ग्राहकांचा EMI किती वाढला आहे ते, 

 15 लाखांचे गृहकर्ज 

जर तुम्ही 20 वर्षांसाठी 7.90 टक्क्याने 15 लाखांचं गृहकर्ज घेतलं आहे. तर तुम्ही आतापर्यंत 12,453 रुपये EMI देत होते. पण आता 8.40 टक्के व्याजदराने तुम्हाला 12,923 रुपये EMI द्यावा लागणार आहे. म्हणजे दरमहिना तुम्हाला 470 रुपयांचा फटका बसणार आहे. म्हणजे वर्षाचा हिशोब केला तर तुम्हाला 5640 रुपयांचा चुना लागणार आहे. 

40 लाखांचे गृहकर्ज

आता पाहूयात ज्या लोकांनी 15 वर्षांसाठी 8.10 टक्क्याने 40 लाखांचे गृहकर्ज घेतले असेल त्यांना नेमका किती EMI भरावा लागेल ते. यापूर्वी तुम्ही 38,457 रुपयांचा EMI भरत होतात. तर आता 8.60 टक्क्यांच्या हिशोबाने तुम्हाला 39,624 रुपयांचा EMI भरावा लागणार आहे. म्हणजे दरमहिना 1167 रुपये तर वर्षाला 14,004 रुपये तुम्हाला जास्त भरावे लागणार आहेत. 

50 लाखांचे गृहकर्ज

आता पाहूयात 50 लाखांच्या ग्राहकांना किती रुपयांचा फटका बसणार आहे. तर 20 वर्षांसाठी तुम्ही 8.25 टक्क्यांच्या हिशोबाने 42,603 ​​रुपयांचा EMI भरायचे. तर आता 8.75 टक्क्यांच्या हिशोबाने 44,186 रुपयांचा EMI भरावा लागणार आहे. याचा अर्थ महिन्याला 1583 रुपये तुम्हाला जास्त द्यावे लागणार आहेत. म्हणजे वर्षांच्या बजेटमध्ये तुम्हाला 18996 रुपयांचा बोजा वाढला आहे. 

RBI ला विश्वास 

RBI ने रेपो रेट वाढीचा सर्वाधिक फटका हा ज्यांनी अलीकडच्या काळात गृहकर्ज घेतला आहे ना पडला आहे. पण आगामी काळात महागाईचा दर कमी होण्याची शक्यता RBIने व्यक्त केली आहे. त्यामुळे गृहकर्जाच्या बोजातून लवकरच दिसाला मिळेल अशी आपण अपेक्षा करु.