सणासुदीला बोनस तर नाहीच पण २५०० कर्मचाऱ्यांना 'नारळ'

 येस बँकेने कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे ठरविले आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 22, 2017, 02:57 PM IST
सणासुदीला बोनस तर नाहीच पण २५०० कर्मचाऱ्यांना 'नारळ' title=

नवी दिल्ली: नवरात्रोत्सवाच्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच आणि देशभरातील सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यां बोनस मिळत आहे. पण येस बँकेने कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे ठरविले आहे. 

ऐन सणासुदीत २५०० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काही अतिरिक्त कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याचा युक्तिवाद यामागे बॅंकेने केला आहे. आलेल्या माहितीनुसार, डिजिटलीकरण आणि ऑटोमेशनमुळे बँकेने साधारण २५००  कर्मचार्यांना घरी बसविलेआहे. बँकेने काढलेल्या कर्मचाऱ्यांची निश्चित संख्या सांगितली नाही. डिजीटलायजेशनमुळे कामाच स्वरुप बदलले आहे. डिजिटलायजेशन,ऑटोमेशनमुळे बॅंकेची उत्पादकता वाढण्याच्यादृष्टीने प्रयत्नशिल आहे.  त्यामुळे काही जागा अतिरिक्तही झाल्या आहेत.

जून २०१७ साली २०,८५१ बँक कर्मचारी संख्या होती. जेव्हा येस बँकेच्या प्रवक्त्याने 2500 लोकांना काढून टाकण्याची खबर सांगितली तेव्हा त्यांनी सांगितले की, दुसऱ्या तिमाहीत कार्याचे विवरण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.