रेशन कार्डसाठी अर्ज करताय? तर ही महत्त्वाची माहिती गरजेची...

काही दिवसांपूर्वीपर्यंत अर्जदार आधार कार्ड, बँक पासबुक आणि ओळखपत्र जोडून ऑनलाइन अर्ज करु शकायचे. परंतु आता...

Updated: Feb 4, 2022, 06:01 PM IST
रेशन कार्डसाठी अर्ज करताय? तर ही महत्त्वाची माहिती गरजेची... title=

मुंबई : सायबर कॅफेमध्ये सध्या रेशनकार्डसाठी अर्ज करण्यासाठी गर्दी लोक गर्दी करत आहेत. काही दिवसांपूर्वीपर्यंत अर्जदार आधार कार्ड, बँक पासबुक आणि ओळखपत्र जोडून ऑनलाइन अर्ज करु शकायचे. परंतु जेव्हा तुम्ही अर्ज कारायला जाल तेव्हा तुमच्याकडून आणखी 3 कागदपत्रे मागितली जाणार आहे. त्यामुळे आता जर तुमचे रेशन कार्डशी संबंधीत काही काम असेल. तर हे कागदपत्र तुमच्या बरोबर घेऊन जा. नाहीतर तुमची गैरसोय होऊ शकते.

वरील कागदपत्रांव्यतिरिक्त आता अर्जदारांकडून जात, उत्पन्न आणि रहिवासी प्रमाणपत्राची मागणी करत आहेत. अर्जात या तीन प्रमाणपत्रांचा कॉलम वाढवण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता तुम्हाला ते जवळ ठेवावे लागेल, कारण त्याशिवाय तुमचा अर्ज वैध ठरणार नाही.

रेशन कार्ड अर्जदार बिगाऊ प्रसाद, बिरेंद्र कुमार, सतेंद्र पांडे यांनी सांगितले की, आम्ही रेशनकार्ड मिळविण्यासाठी अर्ज करण्यासाठी आलो आहोत. सायबर कॅफेतील लोक जात, उत्पन्न, रहिवासी प्रमाणपत्र मागत आहेत. या कागदपत्रांच्या अनुपस्थितीत, अर्ज ऑनलाइन करता येणार नाही. ही प्रमाणपत्रे बनवण्यासाठी 90 रुपये खर्च करावे लागतात. यापूर्वी आधार कार्ड, बँक पासबुक, ओळखपत्र जोडून अर्ज केला जात होता. मग आता का नाही?

अधिकारी लालू कुमार सिंह यांच्या म्हणण्यानुसार, ज्यांनी यापूर्वी अर्ज केले आहेत, त्यांचे अर्ज आता रद्द केले जाणार नाहीत. परंतु यानंतर मात्र अर्जदारांना ही कागदपत्र द्यावी लागतील. आता जो अर्ज करेल त्याने जात, उत्पन्न, रहिवासी प्रमाणपत्र जोडणे सक्तीचे राहील.

परंतु हे लक्षात घ्या की, महाराष्ट्रासाठी हे नियम अद्यापत तरी आलेले नाही. रेशनचे काही नियम हे त्या त्या राज्यानुसार बदलत असतात.