Ration Card : रेशन कार्डाबाबत मोठी अपडेट, नाहीतर धान्य मिळणार नाही ?

Ration Card List: गरीब लोकांसाठी शिधापत्रिका (Ration Card ) खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर गरिबांना रेशन कार्डद्वारे मोफत किंवा कमी किमतीत धान्य उपलब्ध होऊ शकते.

Updated: Sep 24, 2022, 01:15 PM IST
Ration Card : रेशन कार्डाबाबत मोठी अपडेट, नाहीतर धान्य मिळणार नाही ? title=

Ration Card Download: सरकारकडून गरिबांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. सरकार गरिबांना उपचारासाठी कमी खर्चात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत असताना, शासनाकडून गरिबांना कमी खर्चात किंवा मोफत रेशनही दिले जात आहे. यामध्ये शिधापत्रिकेचाही (Ration Card ) समावेश आहे. शिधापत्रिकेच्या मदतीने गरीब लोकांना कुटुंबातील सदस्यांनुसार कमी किमतीत किंवा मोफत रेशन मिळू शकते. मात्र, शिधापत्रिकेतील एक गोष्ट तात्काळ अद्ययावत (Ration card Update) करणेही आवश्यक आहे. अन्यथा रेशनकार्डधारकांना धान्य घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. (Ration Card Latest Update)

ताबडतोब करा अपडेट

दरम्यान, रेशनकार्डमध्ये मोबाईल क्रमांक अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे. ( ration card mobile number change) रेशनकार्डमध्ये चुकीचा क्रमांक अपडेट केल्यास किंवा जुना क्रमांक अपडेट केल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत रेशनकार्ड संबंधित अपडेटही उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे रेशनकार्डमधील मोबाईल क्रमांक अपडेट करणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अपडेट करता येईल

प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र शिधापत्रिका जारी केली जाते. अशा स्थितीत रेशनकार्डमध्ये मोबाईल क्रमांक राज्यवार पद्धतीने अपडेट करता येतो. त्याची प्रक्रिया ऑनलाइन देखील शक्य आहे. जर तुमचे रेशन कार्ड दिल्लीशी जोडलेले असेल, तर काही पायऱ्यांसह रेशनकार्डमधील मोबाईल क्रमांक ऑनलाइन पद्धतीने अपडेट करता येईल.

दिल्लीच्या शिधापत्रिकाधारकांनी या चरणांचे अनुसरण करा सर्वप्रथम https://nfs.delhigovt.nic.in/Citizen/UpdateMobileNumber.aspx या लिंकवर जा.
येथे आधार कार्ड क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक, शिधापत्रिकेत लिहिलेले कुटुंबप्रमुखाचे नाव आणि नवीन मोबाईल क्रमांक टाका.
- कॅप्चा कोड टाका आणि सेव्ह करा.
आता तुमचा नवीन नंबर अपडेट केला जाईल.