होम लोनसंदर्भात RBI ची मोठी घोषणा! RBI गव्हर्नरने EMI बाबतीत दिली दिलासादायक माहिती

RBI Governor Shaktikanta Das On Repo Rate: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shakrikanta Das) यांनी आज पतधोरण जाहीर केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 6, 2023, 10:33 AM IST
होम लोनसंदर्भात RBI ची मोठी घोषणा! RBI गव्हर्नरने EMI बाबतीत दिली दिलासादायक माहिती title=
सर्व सामान्यांना दिलासा देणारा आरबीआयचा निर्णय

RBI Governor Shaktikanta Das On Repo Rate: भारतामधील केंद्रीय बँक असलेल्या रिझर्व्ह बँकने द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं आहे. रिझर्व्ह बँकेने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कर्जावरील व्याजदर म्हणजेच रेपो रेट स्थीर ठेवण्यात येत असल्याचं आरबीआयने जाहीर केलं असून हा सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. व्याजदर स्थिर ठेवण्यात आलेलं हे सलग तिसरं पतधोरण आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shakrikanta Das) यांनी आज पतधोरण जाहीर केलं. रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळेच व्यजदारांमध्ये कोणताही बदल होणार नाही हे स्पष्ट झालं आहे. म्हणजेच होम लोन, व्हेईकल लोन किंवा पसर्नल लोनच्या ईएमआयमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सध्याचा रेपो रेट हा 6.50 टक्के इतका आहे.

नेमकं काय म्हणाले शक्तिकांत दास

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. रेपो रेट हा 6.50 टक्के इतकाच असेल असं शक्तिकांत दास म्हणाले आहेत. रोजच्या आर्थिक व्यवहारांसाठी बँकांना नियमितपणे मोठ्या रकमेची गरज असते. बँकांकडून मागणी असलेल्या या रकमेची गरज पूर्ण करण्यासाठी आरबीआय जी देशातील बँकांची बँक म्हणून ओळखली जाते ती देशातल्या बँकांना अल्प मुदतीचे कर्ज देते. या अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात. त्यामुळेच रेपो रेटच्या दरामध्ये झालेला बदल हा थेट कर्जदारांवर परिणाम करतो. यामागील मुख्य कारण म्हणजे, रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळल्यास बँका ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देतात. रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले की बँकाही आपल्या कर्जांचे दर वाढतात. म्हणूनच रेपो रेट वाढला की सर्वच प्रकारच्या कर्जाचे व्याजदर वाढतात. याचा सर्वाधिक फटका होम लोन घेणाऱ्यांना बसतो.

"स्थूल आर्थिक स्थिरता आणि सर्वसमावेशक वाढ ही आपल्या देशाच्या प्रगतीची मूलभूत तत्त्वे आहेत. अलीकडच्या अनेक वर्षांमध्ये अनेक अतुलनीय धक्के बसत अशतानाही आम्ही ज्या धोरणाचा पाठपुरावा केला आहे. त्यामुळे स आर्थिक आणि आर्थिक स्थिरता वाढली आहे... दशकापूर्वीच्या दुहेरी ताळेबंदाच्या ताणाची जागा आता आरोग्यदायी ताळेबंदीबरोबरच फायद्याने घेतली आहे. हे बँका आणि कॉर्पोरेट्स दोन्हींबद्दल लागू होतं," असं आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर करताना म्हटलं आहे.

एखादी होम लोन घेणारी व्यक्ती बँकेकडून होम लोन घेते तेव्हा त्यावेळी व्याजाचा दर ठरलेला असतो. रेपो रेटमध्ये जसे बदल होतात तसे व्याजदरात बदल केले जातात. रेपो रेट वाढल्यास वाढलेल्या रेटनुसार गृहकर्जाचा हप्ता देखील वाढतो. म्हणूनच रेपो रेट स्थिर राहणे किंवा कमी होणे सर्वसामान्यांसाठी फायद्याचं मानलं जातं.