Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेनिमित्त (bharat jodo yatra) कॉंग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या जोरदार चर्चेत आहेत. कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर पर्यंत जाणाऱ्या या यात्रेत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. भारत जोडो यात्रेसोबत राहुल गांधी यांच्या पेहेरावाचीसुद्धा सध्या जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपासूवी राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेत चालताना थंडी का वाजत नाही असा प्रश्न चर्चेत होता. राहुल गांधी यांनी घातलेल्या कपड्यांवरुनही त्याच्यावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता 'ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन' (AIMIM)चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (asaduddin Owaisi) यांनी राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे.
नुकतेच राहुल गांधी यांनी हरियाणा दौऱ्यात एक वक्तव्य केल्याने ते चर्चेत आले होते. 'राहुल गांधी तुमच्या मनात आहेत, मी त्यांना मारले आहे. राहुल गांधी आहेच नाही, तो निघून गेलाय. तुम्ही जी व्यक्ती पाहत आहात ती राहुल गांधी नाही, असे राहुल गांधी म्हणाले होते. यानंतर आता राहुल गांधी यांनी स्वतःला मारले असेल तर ते काय जिन आहेत का असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.
"आता 50 वर्षांचा झालेला हा काँग्रेस नेता आता म्हणतोय की मला थंडीची भीती वाटत नाही. 50 वर्षात म्हणतं आहे की मी थंडीला मारुन टाकले… आता ते म्हणतायत मी स्वतःला मारुन टाकले. मग तू काय आहेस, तू काय जिन्न आहेस? जर तुम्ही स्वतःला मारले असेल तर ही व्यक्ती कोण आहे? मी असे काही बोललो असतो तर लोकांना वाटले असते की मला काही आजार झालाय," असे ओवेसी म्हणाले.
#WATCH via ANI Multimedia | “Tu kya hai phir? Djinn hai?” Owaisi’s sharp attack on RG’s “have killed Rahul Gandhi” remarkhttps://t.co/0Y0oNocctZ
— ANI (@ANI) January 14, 2023
स्वातंत्र्यात आरएसएसचे कोणतेही योगदान नाही
"एक भारतीय म्हणून मला अभिमान आहे. मी त्या अविभाज्य एकतेचा भाग आहे ज्याला भारतीय राष्ट्रीयत्व म्हणतात. मोहन भागवत यांनी 1000 वर्षांच्या हिंदू युद्धाचा उल्लेख केला. इतकी वर्षे कोणाशी भांडत आहात? भारताला 75 वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळाले असून स्वातंत्र्यात आरएसएसचे कोणतेही योगदान नाही," असेही ओवेसी म्हणाले.