Moonlighting ला सरकारचा हिरवा कंदील; IT कंपन्यांमध्ये तूफान चर्चा!

Moonlighting : कोरोनाच्या काळात 'मूनलाइटिंग'चा ट्रेंड वाढला. घरून कामाचा फायदा घेत एका कंपनीत काम करत असताना कर्मचारी दुसऱ्या ठिकाणी काम करू लागले.  

Updated: Sep 24, 2022, 10:31 AM IST
Moonlighting ला सरकारचा हिरवा कंदील; IT कंपन्यांमध्ये तूफान चर्चा! title=

Moonlighting In IT Sector : मूनलाईटिंग हा आजकाल कंपन्यांमध्ये एक अतिशय लोकप्रिय शब्द बनला आहे. कंपनीच्या सीईओ (CEO) पासून ते अगदी सामान्य कर्मचारी सर्वच मूनलायटिंग (Moonlighting) ची चर्चा होत आहे. मात्र दुसरीकडे या नव्या संकल्पनेतून मोठा वाद देखील निर्माण झाला आहे. (moonlighting gets govt thumbs up)

याचपार्श्वभूमीवर माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrashekh) यांनी मूनलाइटिंगला पाठिंबा दिल्याचे दिसून आले आहे. 

यावर त्यांनी म्हटले की, कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करू नये. राजीव चंद्रशेखर म्हणाले की, आजच्या तरुणांमध्ये आत्मविश्वास आणि उद्देशाची भावना आहे आणि त्यांना स्वतःच्या कौशल्याची कदर करून अधिक पैसे कमवायचे आहेत. ते म्हणाले की ज्या कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना अपमानित करू नका.

विप्रोने 300 कर्मचाऱ्यांना काढून टाकले : केंद्र सरकारच्या मंत्र्याचे हे विधान देखील महत्त्वाचे आहे कारण अलीकडेच विप्रोने (Wipro) मूनलाइटिंगमुळे 300 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. विप्रोने कर्मचार्‍यांची मूनलाइटिंग करणे ही कंपनीची फसवणूक असल्याचे म्हटले आहे. याशिवाय इन्फोसिसने कर्मचाऱ्यांना अंतर्गत मेलद्वारे इशाराही दिला आहे. टीसीएस (TCS) आणि आयबीएमसारख्या (IBM) आयटी (IT) कंपन्याही मूनलाइटिंगला कडाडून विरोध करत आहेत.

कंपनीच्या सुरक्षेलाही धोका

ई-मेलमध्ये म्हटले की, कोरोना काळात घरातून काम आणि रिमोट कामामुळे 'मूनलाइटिंग'ची अधिक प्रकरणे समोर आली आहेत. विशेषत: आयटी (IT) कर्मचार्‍यांसाठी, जे त्यांच्या पहिल्या कंपनीला न कळवता इतरत्र काम करतात. यामुळे आमची उत्पादकता, व्यवसाय आणि नोकरीच्या कामगिरीवर परिणाम होत असल्याने माहिती लीक होण्याचा धोकाही आहे.

वाचा : विराट खोटं नावं वापरून...; टीम इंडियामधील खेळाडूचा धक्कादायक खुलासा!

मूनलाइटिंग म्हणजे काय?

कोरोनाच्या काळात घरून काम (work from home ) करण्याच्या ट्रेंडमध्ये वाढ झाल्यानंतर ही संकल्पना वाढली आहे. मूनलाइटिंग म्हणजे नियमित नोकरीबरोबरच इतर ठिकाणी गुपचूप काम करत राहणे. आयटी क्षेत्रातील अनेक कंपन्यांमध्ये अजूनही घरून काम सुरू आहे. अशा परिस्थितीत इतर कंपनी सोडून इतर कंपनीत काम करून कर्मचारी जादा कमाई करत आहेत.