LOCवर भारतीय लष्करावर BATचा हल्ला, दोन पाकिस्तानी हल्लेखोर ठार

 काश्मिरच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमने भारतीय गस्त घालणाऱ्या जवानांवर हल्ला केला. या हल्ल्याला नाकाम करताना भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केले. 

Updated: May 26, 2017, 05:09 PM IST
LOCवर भारतीय लष्करावर BATचा हल्ला, दोन पाकिस्तानी हल्लेखोर ठार  title=

श्रीनगर :  काश्मिरच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमने भारतीय गस्त घालणाऱ्या जवानांवर हल्ला केला. या हल्ल्याला नाकाम करताना भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केले. 

सेनेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सतर्क जवानांनी आज उरी सेक्टरमध्ये बीएटीकडून गस्त पथकावर केलेला हल्ला परतवून लावला. हल्ल्यात बीएटीचे दोन दहशतवादी ठार झाले. बीएटीचा हल्ला प्रभावीपणे परतविण्यात आला. नियंत्रण रेषेवर नो मॅन्स लँडवर ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह पडलेले आहेत.