नवी दिल्ली : Gyanvapi Survey Latest Update : ज्ञानवापी सर्वेक्षणाचा अहवाल आज न्यायालयात सादर होणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोगाचा अहवाल तयार करण्यासाठी न्यायालय आणखी 2-3 दिवस मागू शकते. सोमवारी हिंदू पक्षाने वुजुखानामध्ये एक मोठे शिवलिंग पाहिल्याचा दावा केला होता, त्यानंतर न्यायालयाने ती जागा सील करण्याचे आदेश दिले आहेत.
ज्ञानवापी मशिदीबाबत थोड्याच वेळात जिल्हा कोर्टात सुनावणी आहे. सर्वेक्षणाचा अहवाल आज जिल्हा न्यायालयात सादर केला जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. अहवाल तयार होण्यास आणखी 2 ते 3 दिवस लागणार आहेत. त्यामुळे हिंदू पक्षकारांच्या वकिलांनी वेळ मागून घेतलाय. तर सर्वोच्च न्यायालयात ही आज ज्ञानवापी मशिदीबाबत सुनावणी आहे. ज्ञानवापी मशिदीमधील सर्वेक्षणाविरोधात मशिद व्यवस्थापनाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी आहे. दरम्यान व्यवस्थापनाची याचिका दंड लावून फेटाळली जावी अशी मागणी हिंदू सेनेनेही सुप्रीम कोर्टात केलीय. यावर आज सुनावणी आहे.
दरम्यान ज्ञानवापी मशिदीत काल वुझूखान्यात एक शिवलिंगासारखा दिसणारा अवशेष सापडलाय. ते शिवलिंगच असा दावा हिंदू पक्षकारांनी केला. त्यावर हिंदू पक्षकारांतर्फे वाराणसी सिव्हील कोर्टात अर्ज करण्यात आला. त्यानुसार आता ज्ञानवापी मशिदीत कोर्टाने या अवशेषांना संरक्षण देण्याचे आदेश दिलेत. तसंच वुझूखानाही सील करण्यात आलाय. मशिदीत केवळ 20 जणांनाच नमाज अदा करण्याची मुभा आहे. याला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने तीव्र आक्षेप घेतलाय. हा एकतर्फी निर्णय आहे असा दावा मुस्लिम पक्षकारांनी केलाय.
दरम्यान, ज्ञानवापी मशिदीपाठोपाठ आता कर्नाटकातल्या एका मशिदीचा वाद समोर येण्याची शक्यता आहे. कर्नाटकमधील जामीनाय मशिद ही टीपू सुलतानच्या काळात बांधण्यात आली. मात्र ही मशीद अंजनेय मंदिराच्या जागेवर बांधण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. याचे ऐतिहासिक पुरावेही असल्याचा दावा केला जातोय. हिंदुत्ववादी संघटनांनी या मशिदीतही सोमावारी पूजाअर्चा करण्याची मागणी केलीय. मंड्या गावाच्या उपायुक्तांना यासाठी अर्ज सादर करण्यात आला आहे.
ज्ञानवापी मशीद परिसरात तीन दिवस चाललेल्या सर्वेक्षणामुळे अधिवक्ता आयुक्त अजय मिश्रा अहवाल तयार करण्यासाठी वेळ घेत आहेत. आज, वकील आयुक्त अजय मिश्रा हे सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवसांची मुदत मागू शकतात.
वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण तीन दिवस (14 एप्रिल ते 16 एप्रिल) करण्यात आले. आज, 17 एप्रिल रोजी आयोग आपल्या सर्वेक्षणाचा अहवाल तयार करून न्यायालयात सादर करणार होता. मात्र आता ज्ञानवापी सर्वेक्षणाचा अहवाल तयार झाला नसल्याच्या बातम्या येत आहेत. सर्वेक्षणाचा अहवाल तयार करण्यासाठी आणखी दोन ते तीन जणांची मागणी होऊ शकते.
हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी सांगितले की, सोमवारी सर्वेक्षणादरम्यान वुजुखानाचे पाणी रिकामे झाले, त्यानंतर त्यात मोठे शिवलिंग दिसले. या शिवलिंगाचा व्यास सुमारे चार फूट असेल आणि त्याची लांबी अडीच ते तीन फूट असेल. शिवलिंगाचे दर्शन झाल्यानंतर लगेचच हा महत्त्वाचा पुरावा जतन करण्यात यावा, असा अर्ज न्यायालयात करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने ती जागा सील करण्याचे आदेश दिले.
ज्ञानवापी मशिदीच्या वधूखान्यात जे सापडले आहे ते शिवलिंग असल्याचेही विष्णू जैन यांनी सांगितले. शिवलिंग आणि कारंजे यात काय फरक आहे ते आपल्याला चांगलेच समजते. विशेष म्हणजे, एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी दावा केला होता की ज्ञानवापी मशीद संकुलात एक कारंजे सापडले आहे, जे शिवलिंग असल्याचे सांगितले जात आहे.