पत्रकार रोहित सरदाना यांच्या चिमुकलीचा व्हीडिओ व्हायरल, डोळ्यात पाणी येईल

 प्रत्येक मुलीसाठी तिचा बाबा तिच्यासाठी बेस्टफ्रेंड, सुपर हिरो सगळं काही असतो. 

Updated: May 9, 2021, 08:07 PM IST
पत्रकार रोहित सरदाना यांच्या चिमुकलीचा व्हीडिओ व्हायरल, डोळ्यात पाणी येईल

मुंबई : प्रत्येक मुलीसाठी तिचा बाबा तिच्यासाठी बेस्टफ्रेंड, सुपर हिरो सगळं काही असतो. मुलगी आणि बाबा नातं हे शब्दात कधीचं सांगता येणार नाही. जीवनात काहीही झालं तरी सर्वप्रथम मोर्चा बाबाकडे जाणार, कारण प्रत्येक मुलीला माहित आहे, बाबाचं चांगलं आणि वाईट यामधील अंतर सांगू शकतो. सध्या देशात अत्यंत भयंकर परिस्थिती आहे. या एका अदृश्य विषाणूने अनेक लेकींना त्यांच्या सुपर हिरोपासून दूर केलं आहे. अशात सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हीडिओ आहे प्रसिद्ध पत्रकार  रोहित सरदान यांच्या मुलीचा. 

रोहित सरदार यांच्या जाण्यामुळे मीडिया विश्वालातर मोठा धक्का बसलाचं आहे, पण त्यांचं कुटुंबासाठी या दुःखातून सावरणं फार कठीण आहे. रोहित सरदान यांना दोन मुली आहेत. सध्या त्यांची मोठी मुलगी नंदिका चर्चेत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हीडिओमध्ये ती  कविता वाचताना दिसत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हीडिओ आताचा नसला तरी फार काही सांगणारा आहे. 

नंदिका वाचत असलेल्या कविता  तिच्या आईने लिहिल्या आहेत. सरदान यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. कवितेमध्ये नंदिका वेळेचं महत्त्व पटवून देत आहे. नंदिकाचा आवाज आणि तिचं कौशल्य पाहून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शिवाय 'एक दिवस तू तुझ्या वडिलांप्रमाणे नाव मोठं करशील..' अशा कमेंट येत आहेत.