Republic day 2023: देशभरात उद्या प्रजासत्ताक दिन (republic day) साजरा केला जात आहे. या प्रजासत्ताक दिनानिमित्त बाजारपेठात तिरंग्याची विक्री सुरु झाली आहे. प्रत्येकजण या दिवशी झेंडे खरेदी करून आपल्या छातीवर अभिमानाने मिरवत असतात.तर काही जण त्यांच्या वाहनांवर देखील झेंडे लावत असतात. मात्र असे करणे त्यांना महागात पडू शकते. फ्लॅग कोडनुसार असे करणाऱ्यांवर कारवाई होते. त्यामुळे नेमके नियम काय आहेत, हे जाणून घेऊयात.
स्वातंत्र्य दिन असो की प्रजासत्ताक दिन (republic day)नागरीक घरांवर, दुकानांवर, शाळांवर, संस्थांवर झेंडा फडकवतात. त्याचवेळी अनेकांना त्यांच्या कार, दुचाकी किंवा इतर वाहनांवर तिरंगा लावणे आवडते. त्यानुसार ते लावतात देखील. त्यामुळे तुम्हीही असे करत असाल तर तुम्हाला ते महागात पडू शकते. कारण भारतीय ध्वज संहितेनुसार तिरंगा फडकवण्याचे काही नियम आहेत. तसेच वाहनांवर तिरंगा लावण्याची देखील नियम आहेत. हे नियम काय आहेत, हे जाणून घेऊयात.
भारतीय ध्वज संहितेनुसार (Flag Code Of India) प्रत्येकजण आपल्या वाहनावर तिरंगा लावू शकत नाही. वाहनांच्या वर, बाजूला किंवा मागे तिरंगा ध्वज लावणे बेकायदेशीर मानले जाते. जर कोणी असे करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
भारतीय ध्वज संहिता (Flag Code Of India) 2022 च्या परिच्छेद 3.44 नुसार राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यांचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल, पंतप्रधान, केंद्रीय कॅबिनेट मंत्री, केंद्रीय मंत्री यांच्या वाहनांवर ध्वज फडकवण्याची परवानगी आहे. राज्य आणि केंद्रीय उपमंत्री याशिवाय लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे उपसभापती, राज्य विधान परिषदांचे अध्यक्ष, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीशही वाहनावर तिरंगा लावू शकतात.
दरम्यान वरील सर्व पदावरील व्यक्ती वाहनांवर झेंडा लावू शकतात. बाकी इतरांनी जर झेंडा लावला तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.