कर्नाटकातील महापौर उपमहापौरपदाचे आरक्षण जाहीर

कर्नाटक राज्यातील ११ महापालिकेच्या महापौर उपमहापौरपदाचे आरक्षण जाहीर झालंय. मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होणार असल्याचे संकेत निवडणूक आयोगाकडून मिळालेत.

Updated: Jan 4, 2018, 11:54 AM IST
कर्नाटकातील महापौर उपमहापौरपदाचे आरक्षण जाहीर title=

कर्नाटक : कर्नाटक राज्यातील ११ महापालिकेच्या महापौर उपमहापौरपदाचे आरक्षण जाहीर झालंय. मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होणार असल्याचे संकेत निवडणूक आयोगाकडून मिळालेत.

बेळगाव बरोबर राज्यातील ११ महा पालिकांच्या महापौर उपमहापौर पदांच आरक्षण देखील जाहीर करण्यात आले आहे. महापौरपदाचा कार्यकाळ १ मार्च रोजी संपत आहे. महापौरपदासाठी अनुसूचित जमात तर उपमहापौर मागास प्रवर्गा साठी खुले करण्यात आले आहे.

सत्ताधारी गटाकडे एकही एसटी प्रवर्गाचा नगरसेवक नसल्याने विरोधी गटाकडे महापौरपद जाण्याची शक्यता आहे. उपमहापौर 
ओबीसीसाठी आरक्षित असल्याने मराठी गटात अनेकांना संधी आहे.