CBSE 10th Result 2018 : या दिवशी जाहीर होणार निकाल

ऑनलाईन असा पाहा निकाल

CBSE 10th Result 2018 : या दिवशी जाहीर होणार निकाल  title=

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) ने दिलेल्या माहितीनुसार 29 मे रोजी संध्याकाळी 4 वाजता 10 च्या विद्यार्थ्यांचा निकाल घोषित होणार आहे. यंदाची सीबीएसआयही परिक्षा अनेक वादामुळे चर्चेत होती. अनेक ठिकाणी प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समोर आली. मात्र मानव संसाधन मंत्रालयाने विद्यार्थ्यांचे वर्ष फुकट जावू नये म्हणून पुर्नपरिक्षा घेतली जाणार नाही. कारण या 10 वीच्या परिक्षेला जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांचा समावेश झाला आहे. 

रिझल्ट बोर्डाने अधिकृत वेबसाइटवर याची माहिती मिळणार असल्याचं सांगितलं आहे. cbse.nic.in, cbseresults.nic.in या संकेतस्थळावर याची माहिती मिळणार आहे. 10 च्या बोर्डाची परिक्षा 5 मार्च ते 4 एप्रिल 2018 या काळात झाली. 12 वीचा पेपर हा 5 एप्रिल ते 13 एप्रिल रोजी झाली. 

असा निकाल पाहू शकता

1) सर्वात प्रथम cbse.nic.in आणि cbseresults.nic.in या संकेतस्थळावर जा

2) रिझल्ट या लिंकवर क्लिक करू शकता

3) आपला रोल नंबर म्हणजे 12 वीचा बोर्डाचा क्रमांक टाका

4) तुमचा रिझल्ट स्क्रिनवर येईल

5) या निकालाची प्रिटं देखील तुम्ही काढू शकता.