किरकोळ महागाईचा दर ४.६२ टक्क्यांवर

 गेल्या १६ महिन्यातील महागाईची ही सर्वोच्च टक्केवारी

Updated: Nov 14, 2019, 09:18 AM IST
किरकोळ महागाईचा दर ४.६२ टक्क्यांवर title=

मुंबई : किरकोळ महागाईचा दर ४.६२ टक्क्यांवर पोहचलाय. गेल्या १६ महिन्यातील महागाईची ही सर्वोच्च टक्केवारी ठरली आहे. रिझर्व्ह बँकेला अपेक्षित महागाईचा दरही ओलांडला गेला आहे. अन्यधान्याचा महागाई दर वाढल्यानं नागरिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. गेल्या महिन्यात महागाईचा दर ३.३८ टक्के होता. तर सोळा महिन्यांपूर्वी म्हणजे जून २०१८मध्ये महागाईचा दर ४.९२ टक्के होता. सणासुदीच्या काळात अन्नधान्याची मागणी वाढते त्याचा परिणाम किरकोळ महागाईवर झाला आहे.

भाज्या महागल्या

कांदे, टमाटर आणि इतर भाज्यांचे भाव वाढल्याने सामान्यांच्या खिशाला याचा फटका बसला आहे. भाज्या जवळपास २६ टक्क्यांनी माहगल्या आहेत. आरबीआयने महागाई दर 4 टक्के असेल अशी शक्यता वर्तवली होती. पण हा आकडा गेल्या १५ महिन्यातील सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे. अन्नधान्या आणि भाज्या महागल्याने महागाईच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली.

महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने एक योजना बनवली आहे. ज्यामध्ये मार्च 2021 पर्यंत महागाई दर ४ टक्क्यांपर्यंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ऑक्टोबरमध्ये फूड प्राइस ग्रोथ 7.89 टक्के होती.

अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आरबीआयकडून लागोपाठ रेपो रेट कमी केला जात आहे. पण ऑक्टोबरमध्ये महागाई दर पुन्हा एकदा वाढला. आतापर्यंत आरबीआयने रेपो रेटमध्ये एकूण 1.35 टक्क्यांपर्यंत घट केली आहे. रेपो रेट सध्या 5.15 टक्के आहे.