नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या जनरल सेक्रेटरी प्रियंका गांधी (Priyanka Gandhi यांचे पती रॉबर्ट वड्रा यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. (Robert Vadra tests positive for Covid-19)त्यानंतर प्रियंका गांधींनीही स्वत: ला आयसोलेट केले आहे. प्रियंका गांधी यांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली आहे. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून स्वत: ला वेगळे ठेवले आहे.
हाल में कोरोना संक्रमण के संपर्क में आने के चलते मुझे अपना असम दौरा रद्द करना पड़ रहा है। मेरी कल की रिपोर्ट नेगेटिव आई है मगर डॉक्टरों की सलाह पर मैं अगले कुछ दिनों तक आइसोलेशन में रहूँगी। इस असुविधा के लिए मैं आप सभी से क्षमाप्रार्थी हूँ। मैं कांग्रेस विजय की प्रार्थना करती हूँ pic.twitter.com/B1PlDyR8rc
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) April 2, 2021
प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला. आपली कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्याचे त्यांनी सांगितले. पण परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण स्वत:ला आयसोलेट केल्याचे त्या म्हणाल्या. यामुळे आसाम, केरळ आणि तामिळनाडूमध्ये निवडणूक प्रचारात भाग घेता येणार नाही. त्यासाठी त्यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांसह जनतेची माफी मागितली आहे.
प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर लिहिले की, 'कोरोना संसर्गाच्या संपर्कात आल्यामुळे मला आसाम दौरा रद्द करावा लागला आहे. माझा कालचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी पुढचे काही दिवस आयसोलेशनमध्ये राहणार आहे. या गैरसोयीबद्दल मी तुम्हा सर्वांची दिलगिरी व्यक्त करते. मी कॉंग्रेसच्या विजयासाठी प्रार्थना करते'.
गेल्या 24 तासांत देशात 81466 नवीन कोरोनाच्या (Coronavirus केसेस समोर आल्या आहेत. यानंतर देशात संसर्ग झालेल्यांची संख्या 1 कोटी 23 लाख 3 हजार 131 झाली आहे. गेल्या 24 तासांत 469 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतांचा आकडा 1 लाख 63 हजार 396 वर पोहोचला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरातील 50356 लोक कोरोनाव्हायरसपासून बरे झाले आहेत. आतापर्यंत 1 कोटी 15 लाख 25 हजार 39 लोक बरे झाले आहेत.
गेल्या 24 तासात कोविड 19 च्या पॉझिटीव्ह प्रकरणांमध्ये 31110 ची वाढ झाली आहे. देशभरात 6 लाख 14 हजार 696 लोकांवर उपचार सुरू आहेत.