RRB Group D Admit Card Dates Out: रेल्वे भरती बोर्ड (RRB)ने ग्रुप डी भरती परीक्षेच्या पहिल्या पहिल्या टप्प्याचे प्रवेश पत्र (Admit Card)जारी केले आहेत. आरआरबी ग्रुप डी परीक्षेला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईट rrbcdg.gov.inवर लॉग इन करून डाऊनलोड करता येईल.
यावर्षी ग्रुप डी पदासाठी 17 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2022 या कालावधीत परीक्षा होणार आहे. परीक्षा वेगवेगळ्या टप्प्यात घेतली जाईल. RRB ने परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख देखील जाहीर केली आहे. यासह हे देखील लक्षात घ्यावे की बोर्डाने उमेदवारांसाठी CBT मॉक टेस्ट लिंक देखील सक्रिय केली आहे.
RRB ने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, परीक्षा केंद्र शहर, परीक्षेची तारीख पाहण्यासाठी आणि SC/ST उमेदवारांसाठी मोफत प्रवासासाठी अधिकृत फॉर्म डाउनलोड करण्याची लिंक 09 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10:00 वाजता सर्व RRB च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असेल.
परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी परीक्षा केंद्रावर उमेदवारांची आधार लिंक्ड बायोमेट्रिक पडताळणी केली जाईल. उमेदवारांनी त्यांचे मूळ आधार कार्ड आणणे आवश्यक आहे.
13 ऑगस्ट 2022 पासून उमेदवार आरआरबी ग्रुप डी प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. RRB ग्रुप डी हॉल तिकीट डाउनलोड करण्याच्या स्टेप्स .