Nokia ने लॉन्च केला 27 दिवस चालणारा जबरदस्त Phone, किंमत कमी आणि भरपूर काही

Nokia 8210 4G Price In India: HMD Global ने भारतात आणखी एक Nokia फीचर फोन लॉन्च केला आहे. Nokia 8210 4G, असे या फीचर फोनचे नाव आहे आणि तो 4G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. 

Updated: Aug 10, 2022, 07:49 AM IST
Nokia ने लॉन्च केला 27 दिवस चालणारा जबरदस्त Phone, किंमत कमी आणि भरपूर काही title=

मुंबई : Nokia 8210 4G Price In India: HMD Global ने भारतात आणखी एक Nokia फीचर फोन लॉन्च केला आहे. Nokia 8210 4G, असे या फीचर फोनचे नाव आहे आणि तो 4G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. याचे मोठे वैशिष्ट्ये म्हणजे 27 दिवसांची बॅटरी बॅकअप यात देण्यात आला आहे. त्यामुळे हा फोन एकदा चार्ज केला की 27 दिवस चालू शकतो.

  Nokia 8210 4G याचा मोठा डिस्प्ले आहे. हा मस्त फोन Nokia कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि Amazon द्वारे खरेदीसाठी करु शकता. फोनच्या डिझाईनलाही लोकांची पसंती मिळत आहे.  Nokia 8210 4G ची किंमत (Nokia 8210 4G Price in India) आणि फीचर्स, जाणून घ्या.

Nokia 8210 4G ची भारतात किंमत

Nokia 8210 4G कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि Amazon वर 3,999 रुपयांना उपलब्ध आहे. हा फोन दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात गडद निळा आणि लाल रंगाचा समावेश आहे. यासोबतच कंपनी ग्राहकांना एक वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटीही देत ​​आहे. त्यामुळे या फोन खरेदीसाठी उड्या पडणार आहे.

 Nokia 8210 4G Specifications

Nokia 8210 4G मध्ये 2.8-इंचाचा QVGA डिस्प्ले आहे. हा फीचर फोन UniSoc T107 चिपसेटद्वारे चालतो. विशेष म्हणजे, फोन 128MB RAM वर चालतो आणि 48MB ऑनबोर्ड स्टोरेज आहे. हा फीचर फोन S30+ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.

नोकिया तगडी बॅटरी क्षमता

मायक्रो SD कार्ड वापरून 32GB पर्यंत स्टोरेज वाढवू शकतात. Nokia 8210 4G मध्ये वायरलेस FM रेडिओ आणि एक समर्पित MP3 प्लेयर देखील आहे. स्मार्टफोनवरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 4G (Nano Dual-SIM), Bluetooth v5.0, 3.5mm हेडफोन जॅक आणि एक मायक्रो USB केबल पोर्ट समाविष्ट आहे. यासह, यात 1,450 mAh ची काढता येण्याजोगी बॅटरी आहे. जी एका चार्जवर सहा तासांचा टॉकटाइम (4G नेटवर्क) आणि 27 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाइम देते.

नोकिया 8210 4G कॅमेरा

Nokia 8210 4G च्या फोटो काढण्यासाठी 0.3MP कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेराच्या अगदी वर मागील स्पीकर व्हेंट आहे. नोकिया 8210 4G गेमलॉफ्ट गेमसह स्नेक, टेट्रिस, ब्लॅकजॅक, अ‍ॅरो मास्टर आणि ओरिजिनल डेटा गेम या देण्यात आला आहे.