'या' आमदाराला वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इतक्या वर्षांची जेलवारी

3 वर्षांपूर्वी केलेलं  वादग्रस्त वक्तव्य (azam khan convicted) चांगलंच महागात पडलंय. न्यायालयाने वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणात आमदाराला (Hate Speech)  दोषी ठरवत 3 वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.    

Updated: Oct 27, 2022, 05:26 PM IST
 'या' आमदाराला वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इतक्या वर्षांची जेलवारी title=

मुंबई : राजकारणाचा (Politics) स्तर गेल्या काही वर्षांमध्ये चांगलाच घसरलाय. भाषण करताना विरोधी पक्षातील (Oppositon) नेत्यावर बेछूटपणे टीका केली जाते. मात्र या दरम्यान काहींची जीभ घसरते (Controversial Statement) आणि वादाला तोंड फुटतं. असंच एका आमदाराला (Mla) 3 वर्षांपूर्वी केलेलं  वादग्रस्त वक्तव्य चांगलंच महागात पडलंय. न्यायालयाने (Court) या वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणात आमदाराला दोषी ठरवत 3 वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.  25 हजार रुपयेही दंड भरावा लागलाय. सोबतच आमदाराकी गमावण्याची टांगती तलवार आहे. दरम्यान या आमदाराला जामीन मिळू शकतो.  त्यामुळे जामीन मिळवण्यासाठी या आमदाराकडे एक महिन्यांचा कालावधी असणार आहे. (samajwadi party mla azam khan convicted to 3 years in hate speech case)

समाजवादी पार्टीचे (Samjawadi Party) वरिष्ठ नेता आणि रामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आजम खान (Azam khan) यांना एमपी-एमएलए न्यायालयाने (Mp-Mla Court) हेट स्पीच प्रकरणी गुरुवारी ही शिक्षा सुनावलीय. न्यायालयाने खान यांना 125, 505 आणि 153 ए नुसार शिक्षा सुनावण्यात आलीय.

हेट स्पीच प्रकरण नक्की आहे तरी काय?

भाजप नेता आकाश सक्सेना यांनी 27 जुलै 2019 रोजी आजम खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.  रामपूरमधील मिलक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाषणाद्ववारे जनतेला संबोधित केलं. खान यांनी या भाषणादरम्यान  पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्तकालीन डीएम यांच्यावर टीका करताना आपत्तीजनक भाषा वापरल्याचा आरोप सक्सेना यांनी केला होता. दरम्यान आता 3 वर्षानंतर खान यांना शिक्षा सुनावण्यात आलीय.