'या' बँकेत ग्राहकांसाठी 'डोअरस्टेप'ची सुविधा

ग्राहकांना घरपोच बँकेची सुविधा मिळणार आहे.  

Updated: Jan 18, 2021, 09:17 AM IST
'या' बँकेत ग्राहकांसाठी 'डोअरस्टेप'ची सुविधा

मुंबई : SBI बॅंकेने ग्राहकांसाठी 'डोअरस्टेप'ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना घरपोच बँकेची सुविधा मिळणार आहे. 'डोअरस्टेप'च्या माध्यमातून ग्राहक आता घरबसल्या पैसे काढू शकतात, शिवाय बँकेचे व्यवहार करणं देखीस सोप होणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात SBI बँकेने त्यांच्या कोट्यवधी ग्राहकांना भेट दिली आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. 

आता ग्राहकांना घरबसल्या पैसे काढण्याची, जमा करण्याची सुविधा मिळणार आहे. स्टेट बँक ग्राहकांना डोअरस्टेप बँकिंगची सुविधा देते आहे. यात चेक, डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डरचे पिक अप, अकाउंट स्टेटमेंट रिक्वेस्ट , टर्म डिपॉझिट पावती अशा नॉन-फायनान्शिअल सर्व्हिसेस बँकेतून घरबसल्या दिल्या जाणार आहेत. 

स्टेट बँक ऑफ इंडियाने एका ट्विटद्वारे ही माहिती दिली. SBI बँकेच्या या निर्णयामुळे अनेक ग्राहकांना या सुविधेचा फायदा होणार आहे. या सुविधेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला आजच रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. त्याचप्रमाणे अधिक माहिती देण्यासाठी  https://bank.sbi/dsbया संकेतस्थळाला भेट द्या.