SBI च्या ग्राहकांना एका महिन्यात दुसऱ्यांदा झटका; नवीन नियम लागू

SBI MCLR Hike | SBI ने एका महिन्यात सलग दुसऱ्यांदा MCLR मध्ये वाढ केली आहे. त्यामुळे बँकेची कर्जे महाग होतील. एसबीआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बदललेला MCLR दर 15 मे पासून लागू होईल.

Updated: May 16, 2022, 02:56 PM IST
SBI च्या ग्राहकांना एका महिन्यात दुसऱ्यांदा झटका; नवीन नियम लागू title=

मुंबई : SBI MCLR Hike : स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना पुन्हा एकदा झटका दिला आहे. एसबीआयने व्याजदरात पुन्हा वाढ केली आहे. बँकेने कर्जदराच्या मार्ज‍िनल कॉस्‍ट ऑफ लेंड‍िंग रेट्समध्ये 10 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. त्यानंतर बँकेने ग्राहकांना दिलेले कर्ज महाग होईल. नवीन दर 15 मे पासून लागू होतील. यापूर्वी एप्रिलमध्येही बँकेने MCLR वाढवला होता.

EMI वाढेल

तुम्ही SBI कडून गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा कार लोन घेतले असेल, तर तुमचा EMI पुन्हा वाढणार आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेने एका महिन्यात दुसऱ्यांदा MCLR वाढवला आहे. दोन्ही वेळा ही वाढ मिळून 0.2 टक्के होती.

रेपो दर वाढीनंतर केलेले बदल

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने रेपो दरात वाढ केल्यानंतर SBI ने हा बदल केला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला आरबीआयने रेपो रेट 0.40 टक्क्यांनी वाढवून 4.40 टक्के केला होता. एसबीआयने व्याजदरात वाढ केल्यानंतर आगामी काळात इतर बँकांचे कर्जही महाग होण्याची शक्यता आहे.

नवीन दर 15 मे पासून लागू 

एसबीआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बदललेला MCLR दर 15 मे पासून लागू होईल. एक वर्षाचा MCLR 7.10 टक्क्यांवरून 7.20 टक्के झाला.