SBI Recruitment 2021 : 12वीं पास उमेदवारांना SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

बँकेत नोकरी शोधनाऱ्या उमेजवारांसाठी चांगली बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) नोकरीची सुवर्णसंधी उप्लब्ध केली आहे.

Updated: Apr 24, 2021, 09:55 PM IST
SBI Recruitment 2021 : 12वीं पास उमेदवारांना SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी title=

मुंबई : बँकेत नोकरी शोधनाऱ्या उमेजवारांसाठी चांगली बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) नोकरीची सुवर्णसंधी उप्लब्ध केली आहे. यासाठी(SBI Recruitment 2021)  एसबीआयने लिपिक संवर्ग अंतर्गत फार्मासिस्ट भरतीसाठी  67 अर्ज मागविले आहेत. ज्यांना या पदासाठी अर्ज करायचा आहे, ते एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर sbi.co.in. भेट देऊन अर्ज करू शकतात.

या व्यतिरिक्त https://ibpsonline.ibps.in/sbiphccmar21/ या लिंकवर क्लिक करून उमेदवार या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. या भरतीसाठी ऑनलाईन लेखी परीक्षा 23 मे 2021 रोजी पर्यंत घेतली जाईल. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 मे आहे.

SBI Recruitment 2021: महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज प्रारंभ : 13 मार्च 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 मे 2021
परीक्षेची तारीख: 23 मे 2021

SBI Recruitment 2021: पात्रता

उमेदवारांनी 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसी (D.Pharma) डिप्लोमा किंवा फार्मसीमध्ये डिग्री (B Pharma / M Pharma / Pharma D) किंवा  समकक्ष पदवी असावी. तसेच, फार्मासिस्ट किंवा कंपाऊंडर म्हणून 3 वर्षांचा किमान शैक्षणिक पात्रता अनुभव असावा.

SBI Recruitment 2021: वयोमर्यादा

उमेदवारांची वयोमर्यादा 30 वर्षे असावी

SBI Recruitment 2021: अर्ज फी

उमेदवारांना सामान्य / ओबीसी (OBC) / ईडब्ल्यूएससाठी (EWS) 750 रुपये आणि अनुसूचित जाती(SC) / जमाती(ST) / पीडब्ल्यूडी (PWD) उमेदवारांना अर्ज विनामूल्य आहे.