SBI च्या सर्व शाखांमध्ये ही विशेष सुविधा सुरू! लाखो ग्राहकांना होणार फायदा

sbi latest new rule : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने जाहीर केले आहे त्यांच्या शाखांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची म्हणजेचImmediate Payment Service (IMPS)ची मर्यादा वाढवली आहे

Updated: Jan 4, 2022, 12:10 PM IST
SBI च्या सर्व शाखांमध्ये ही विशेष सुविधा सुरू! लाखो ग्राहकांना होणार फायदा title=

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने जाहीर केले आहे त्यांच्या शाखांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची म्हणजेचImmediate Payment Service (IMPS)ची मर्यादा वाढवली आहे. SBI च्या वेबसाइटनुसार, 1 फेब्रुवारी 2022 पासून IMPS व्यवहारांसाठी नवीन स्लॅब निर्माण करण्यात आला आहे.

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने जाहीर केले आहे की, त्यांनी आता प्रत्येक शाखेत पैसे  ट्रान्सफर करण्यासाठी IMPS मर्यादा वाढवली आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 1 फेब्रुवारी 2022 पासून IMPS व्यवहारांसाठी नवीन स्लॅब जोडण्यात आला आहे.

हा नवीन स्लॅब 2 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत आहे. 2 लाख ते 5 लाख रुपयांच्या दरम्यान, IMPS द्वारे पैसे पाठवण्याचे शुल्क 20 रुपये आणि GST इतका असेल. 

IMPS ही बँकांद्वारे प्रदान केलेली अशी पेमेंट सेवा आहे, ज्याद्वारे रिअल टाइम इंटर बँक फंड ट्रान्सफर केले जातात.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x