ग्वाल्हेर : ग्वाल्हेरच्या कमलराजा हॉस्पिटलचा व्हिडिओ (Gwalior Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक कुत्रा रुग्णाच्या पलंगावर झोपला आहे. रुग्णालयात उपस्थित असलेल्या व्यक्तीने त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. रुग्णालय व्यवस्थापनाकडून याबाबत कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.
मध्य प्रदेशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी आमची पूर्ण तयारी असल्याचा, असा सरकारचा दावा आहे. परंतू, ग्वाल्हेरमधील कमलराजा या सर्वात मोठ्या हॉस्पिटलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल. (Kamalaraja Hospital Video Viral)
रुग्णांसाठी असलेल्या खोलीच्या बेडवर कुत्रा झोपला असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. कुत्र्याला रुग्णाच्या पलंगातून बाहेर काढायला कोणीच नव्हते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
प्रत्यक्षात कमलराजा रुग्णालयात प्रसूती व बालके उपचारासाठी येतात. रुग्ण संख्या वाढल्यास रुग्णांना बेडही मिळू शकत नाही, अशी येथील परिस्थिती असते. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रुग्णालयात रुग्णांना बेड मिळत नसून ते जमिनीवर झोपल्याचे दिसत आहे.
परंतू याच हॉस्पिटलच्या एका खोलीत बेडवर कुत्रा झोपलेला दिसला. रुग्णालयात उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने त्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.
येथे प्रश्न असा उपस्थित होतो की, हॉस्पिटलमध्ये प्रवेश करताना रुग्णांना बाहेर उभ्या असलेल्या चौकीदाराच्या तपासणीतून जावे लागते. इतक्या कडक सुरक्षा व्यवस्थेनंतरही एखादा कुत्रा आत कसा प्रवेश करू शकतो? विशेष म्हणजे तो बेडवर जाऊन कसा झोपू शकतो. हॉस्पिटल व्यवस्थापनाचे लक्ष नाही का?
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अंदाज येतो की, महानगरांमध्ये रुग्णालयांची काय परिस्थिती आहे. त्यामुळे राज्य सरकारांनी आपल्या रुग्णालयांची व्यवस्था सुधारून लोकांना चांगली सेवा प्रदान करावी अशी मागणी नेटकरी करीत आहेत