SBI ची जबरदस्त स्किम! फक्त 12 लाखाचे झाले दीड कोटी; तुम्ही गुंतवणूक केली का?

भांडवली बाजारात अशा अनेक स्किम आहेत, ज्यांनी दीर्घ अवधीच्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. शेअर्समध्ये थेट गुंतवणूक करण्याचा धोका टाळायचा असेल, तर म्युच्युअल फंडातही असे काही पर्याय आहेत.

Updated: Nov 19, 2021, 01:14 PM IST
SBI ची जबरदस्त स्किम! फक्त 12 लाखाचे झाले दीड कोटी; तुम्ही गुंतवणूक केली का? title=

मुंबई : इतर गुंतवणुकीच्या पर्यायांच्या तुलनेत इक्विटी किंवा इक्विटी संबंधित योजनांना जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते. भांडवली बाजारात अशा अनेक इक्विटी योजना आहेत. ज्यांनी दीर्घ अवधीच्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. शेअर्समध्ये थेट गुंतवणूक करण्याचा धोका टाळायचा असेल, तर म्युच्युअल फंडातही असे काही पर्याय आहेत. मागील काही वर्षातील कामगिरी पाहता,  SBI द्वारे संचालित SBI मॅग्नम ग्लोबल फंडने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. (SBI Magnum Global Fund)

ही योजना जवळपास 27 वर्षे जुनी आहे आणि ती लॉन्च झाल्यापासून गुंतवणूकदारांसाठी रिटर्न मशीन ठरली आहे. फंडाचा SIP परतावा गेल्या 20 वर्षांमध्ये 21% CAGR आहे. या दरम्यान, यामध्ये मासिक 5000 रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.4 कोटी रुपयांवर गेले आहे. यादरम्यान एखाद्या  गुंतवणूकदाराने 12 लाख रुपयांची गुंतवणूक  केली असेल.

SBI मॅग्नम ग्लोबल फंडाची कामगिरी

SBI Magnum Global Fund ने SIP गुंतवणूकदारांना 20 वर्षात 21% CAGR परतावा दिला आहे. या दरम्यान दरमहा 5000 रुपयांची SIP करणाऱ्यांचा पैसा 1.42 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.

दुसरीकडे, ज्यांनी या योजनेत एकरकमी गुंतवणूक केली होती आणि 20 वर्षे वाट पाहिली, त्यांच्या पैशात 68 पटीने वाढ झाली आहे. येथे 1 लाखांची गुंतवणूक वाढून 68 लाखांहून अधिक झाली.

15 वर्षांत, दरमहा 5000 रुपयांची SIP गुंतवणूकदारांचा पैसा 36 लाख रुपयांपर्यंत वाढला आहे. दुसरीकडे, ज्यांनी या योजनेत 20 वर्षांसाठी एकरकमी गुंतवणूक केली, त्यांच्या पैशात 7 पटीने वाढ झाली आहे.