SBI चं खातं बंद करताना आता नो शुल्क

तुमचं एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं आहे? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 27, 2017, 01:41 PM IST
SBI चं खातं बंद करताना आता नो शुल्क   title=
File Photo

नवी दिल्ली : तुमचं एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं आहे? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या बँक खातेधारकांच्या किमान रक्कम ठेवण्याच्या रकमेत कपात केल्यानंतर आता आणखीन एक निर्णय घेतला आहे. SBI ने दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबरपासून बँक खाते बंद करण्याच्या शुल्कात बदल करण्यात आला आहे.

यापूर्वी SBI ने किमान रक्कमचा नियमही एक ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. नव्या नियमानुसार, बँक अकाऊंट एक वर्षानंतर जर एखाद्या ग्राहकाने बंद केलं तर त्याला कुठल्याही प्रकारचं शुल्क द्याव लागणार नाही. तसेच एखाद्या व्यक्तीचं निधन झालं असेल तर ते खातं बंद करण्यासाठीही कुठलचं शुल्क आकारलं जाणार नाहीये.

रेग्युलर सेव्हिंग अकाऊंट आणि बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाऊंट बंद करतानाही कुठल्याही प्रकारचं शुल्क द्याव लागणार नाही. आतापर्यंत असे खाते बंद करण्यासाठी ५०० रुपयांचं शुल्क आणि जीएसटी द्यावा लागत असे.

SBI ने दिलेल्या वृत्तानुसार, एखादा खातेधारक अकाऊंट सुरु केल्यानंतर १४ दिवसांपूर्वीच अकाऊंट बंद करत असेल तर त्याला कुठलचं शुल्क द्यावं लागणार नाही. मात्र, १४ दिवसांनंतर आणि एक वर्षाच्या आधी जर ते अकाऊंट बंद केलं तर ५०० रुपये शुल्क आणि जीएसटी द्यावा लागणार आहे.

यापूर्वी सोमवारी एसबीआयने आपल्या खातेधारकांना बचत खात्यामध्ये महिन्याला कमीत कमी ५ हजार रुपये बॅलन्स बंधनकारक करण्याच्या आपल्या निर्णयात बदल केला. ही रक्कम पाच हजारावरुन ३००० रुपये करण्यात आली आहे.