बचत खात्यावर कमी व्याजदर, आजपासून बँकांचे नवे नियम लागू

 या नव्या नियमांमुळे आपल्या पैशांवर याचा थेट परिणाम होणार

Updated: Nov 2, 2019, 08:45 AM IST
बचत खात्यावर कमी व्याजदर, आजपासून बँकांचे नवे नियम लागू title=

मुंबई : आजपासून बॅकांचे नवे नियम लागू होत आहेत. या नव्या नियमांमुळे आपल्या पैशांवर याचा थेट परिणाम होऊ शकणार आहे. संपूर्ण देशातील बँकिंग सिस्टीममध्ये आजपासून बदल होतोय.  बँकेच्या 42 कोटी ग्राहकांवर याचा परिणाम होणार असून एक लाख रुपयांपर्यंतच्या डिपॉझिटचा व्याजदर आता 3.25 टक्के करण्यात आला आहे. 

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डिपॉझिट व्याजदरात आजपासून बदल होणार आहे. एक लाख रुपयांपर्यंतच्या डिपॉझिट व्याजदर आता ३.५० टक्क्यांवरून ३.२५ टक्के करण्यात आला आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो दरात कपात केल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने हे पाऊल उचललं आहे. एसबीआयने 1 नोव्हेंबर 2019 पासून ही घोषणा केली आहे. 

एसबीआयने फिक्स डिपॉझीटवरील काही निवड मॅच्युरिटीवर व्याजदर कमी केला आहे. तसेच 2 करोडचया फिक्स डिपॉझीटवर एसबीआयने 4.50 ते 6.40 टक्के व्याजदर देत आहे. या एफडींची मुदत ही 7 दिवस ते 10 वर्षे आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने आतापर्यंत पाचव्यांदा रेपो दरात कपात केली आहे. एसबीआयने निवडक मुदत ठेवींचे व्याजदरही कमी केले आहेत. नवीन एफडी दर १० ऑक्टोबर २०१९ पासून लागू झाले आहेत.

रेपो दर म्हणजे काय?

दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. हे अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात.

महाराष्ट्रातल्या बँकांचं नवं वेळापत्रक ठरवण्यात आलं आहे. आता सगळ्या बँका ह्या एकाच वेळी सुरु होणार आणि एकाच वेळी बंद होणार आहेत. बॅकांची कामाची वेळी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ करण्यात आली आहे. तसंच व्यावसायिकांना डिजिटल व्यवहार अनिर्वाय करण्यात आले आहेत.