मुंबई: अजूनही नोकरीच्या संधी शोधत असणारे किंवा ज्यांना सरकारी नोकरी करायची आहे अशा सर्व इच्छुक उमेदवारांसाठी एक खास संधी आहे. भारतीय स्टेट बँकेमध्ये खास ऑफिसर पदांसाठी भरती सुरू आहे. या पदांसाठी इच्छुक असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. या पदांसाठी निवड करताना कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. त्यामुळे ही सुवर्णसंधी इच्छुक उमेदवारांनी सोडू नका.
भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. SBI ने स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) च्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार जे या पदांसाठी अर्ज करू इच्छितात (SBI SO Recruitment 2021) SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर आहे.
याशिवाय इच्छुक उमेदवार https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2021-22-17/apply या लिंकवर जाऊन अर्ज भरू शकतात. 616 रिक्त पदांसाठी ही भरती सुरू आहे. त्यामुळे इच्छुक आणि गरजू उमेदवारांनी ही संधी सोडू नये. ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख 28 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर असल्याची माहिती मिळाली आहे.
SBI रिक्त पद कोणती आणि किती जागा
स्पेशलिस्ट कॅडर अधिकारी - 616
रिलेशनशिप मॅनेजर - रिक्त पदं- 314
अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं वय 23 ते 35 वर्ष असायला हवं. पगार 6 ते 15 लाख रुपये पगार.
रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) रिक्त पदं - 20
अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं वय 28 ते 40 वर्ष असायला हवं. पगार 10 ते 28 लाख रुपये पगार.
कस्टमर रिलेशनशिप एक्झिकेटिव रिक्त पदं – 217
अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं वय 20 ते 35 वर्ष असायला हवं. पगार 2 ते 3 लाख रुपये पगार.
गुंतवणूक अधिकारी – रिक्त पदं 12
अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं वय 28 ते 40 वर्ष असायला हवं. पगार 12 ते 18 लाख रुपये पगार.
केंद्रीय संशोधन संघ (प्रोडक्ट लीड) रिक्त पदं – 2
अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं वय 30 ते 45 वर्ष असायला हवं. पगार 25 ते 45 लाख रुपये पगार.
केंद्रीय संशोधन संघ (सहायता) रिक्त पदं – 2
अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं वय 25 ते 35 वर्ष असायला हवं. पगार 7 ते 10 लाख रुपये पगार.
मॅनेजर (मार्केटिंग) रिक्त पदं – 12
अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं वय 40 वर्ष असायला हवं. 63840-1990/5-73790- 2220/2-78230 रुपये पगार.
डिप्यूटी मॅनेजर (मार्केटिंग) रिक्त पदं – 26
अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं वय 35 वर्ष असायला हवं. 48170-1740/1-49910-1990/10-69810 रुपये पगार.
कार्यकारी (दस्तऐवज संरक्षण-संग्रहण) रिक्त पदं – 1
अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं वय 30 वर्ष असायला हवं. पगार 8 ते 12 लाख रुपये पगार.