यापुढे बॅंकेत जाण्याची गरज नाही, एका कॉलवर मिळतील सर्व सुविधा

आपल्या ग्राहकांसाठी कॉन्टॅक्टलेस सेवा

Updated: May 8, 2021, 09:02 AM IST
यापुढे बॅंकेत जाण्याची गरज नाही, एका कॉलवर मिळतील सर्व सुविधा title=

नवी दिल्ली : कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या केसेस लक्षात घेता स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी कॉन्टॅक्टलेस सेवा (SBI Contactless Service) सुरू केली आहे. आता वापरकर्ते घरी बसून फोनवर बँकेशी संबंधित अनेक कामे करु शकतील.

एसबीआयचे टोल फ्री क्रमांक

'घरी सुरक्षित राहा, आम्ही तुमची सेवा करण्यासाठी इथे आहोत. एसबीआय आपल्याला एक संपर्कहीन सेवा देते जी आपल्याला आपल्या बँकिंग गरजा तात्काळ पूर्ण करण्यात मदत करेल. आमच्या टोल फ्री क्रमांकावर 1800 112 211 किंवा 1800 425 3800 वर कॉल करा. असे एसबीआयने ट्विटमध्ये म्हटले आहे.  (SBI issued toll free numbers)

एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये एक व्हिडिओ देखील जोडला आहे.

या क्रमांकावर कॉल केल्यास ग्राहकांना घरातून कोणतीही सेवा घेऊ शकतात. नवीन एटीएम, खाते शिल्लक आणि शेवटचे 5 व्यवहार, एटीएम बंद करणे किंवा चालू करणे, एटीएम पिन किंवा ग्रीन पिन तयार करण्यासाठी या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करू शकता असे या व्हिडीओमध्ये म्हटलंय.

 

एसबीआय देशातील सर्वात मोठे बँकिंग नेटवर्क आहे. यांच्या देशभरात 22,000 शाखा आणि 57,889 एटीएम आहेत. 31 डिसेंबर 2020 पर्यंत एसबीआयकडे 85 दशलक्ष इंटरनेट बँकिंग आणि 19 दशलक्ष मोबाइल बँकिंग ग्राहक आहेत. त्याचवेळी, PI वापरकर्त्यांची संख्या अधिक वाढली आहे, जी डिसेंबर अखेरपर्यंत 135 दशलक्ष नोंदविली गेली आहे.