तुमचं Break-up होण्याआधीच तुम्हाला संकेत मिळणार; कधी, कुठे, केव्हा होणार हेही समजणार?

Break Up Predictions: हल्ली ब्रेकअपच्या अनेक गोष्टी व्हायरल होताना दिसतात. कधी ब्रेकअप न होण्याच्या टीप्स तर कधी ब्रेकअप झाल्यानंतर काळजी घेण्याच्या टीप्स. परंतु सध्या एका बातमीनं मात्र सगळीकडेच मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. यावेळी तुम्हाला चक्क तुमचं ब्रेकअप होणार आहे की नाही हे तीन महिने अगोदरच कळणार आहे. कसं, कुठे आणि कधी? काय सांगत संशोधन? 

Updated: Jan 3, 2023, 06:44 PM IST
तुमचं Break-up होण्याआधीच तुम्हाला संकेत मिळणार; कधी, कुठे, केव्हा होणार हेही समजणार? title=
breakup predictions

Break Up Predictions: आपलं ब्रेकअप कधी होईल याचा आपल्याला काहीच थांगपत्ता लागत नाही. परंतु अशावेळी काय करावं हेही आपल्याला सुचत नाही. आपलं आपल्या पार्टनरशी (breakup with partner) चांगलं बोलणं होतं असतं, एकमेकांसोबत चांगला वेळही आपण व्यतित करत असतो परंतु असं अचानक काय होतं आणि आपला पार्टनर आपल्याशी बोलूच लागत नाही. पहिल्यासारखं त्याच्यात काहीच दिसत नाही आणि अचानक आपल्यात दुरावा निर्माण होतो. हा दुरावा इतका वाढत जातो की आपल्या पार्टनरसोबत (love partners) आपलं भांडणं होऊ लागतं आणि या दुराव्याचं आणि भांडणांचं पर्यवसन शेवटी ब्रेकअपमध्ये होतं. 'तो माझ्याशी बोलत नाही', 'तिनं मला आता पहिल्यासारखा वेळ देत नाही'. 'तिचं किंवा त्याचं आपल्याकडे काहीच लक्ष नसतं', किंवा 'आजकाल काहीतरी बिनसलं आहे', अशा एक नाही तर हजारो तक्रारी आपल्या ब्रेकअपच्या आधी सुरू होतात. आपल्याला कळतं असतं की आपल्या नात्यात Relationships) दुरावा आला आहे परंतु त्याचं कारणंच कळतं नाही. (Scientists Can Predict break-up before three months, see how it will be beneficial)

पण हो, तुम्हाला तुमचं ब्रेकअप होणार की नाही हे काही महिन्यांपुर्वीच कळणार आहे. ऑस्टिन येथील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास (University of Texas) या संस्थेचं एक संशोधन समोर आलं आहे. त्यात या संस्थेनं 6803 रेडिट युझर्सच्या 1,027,541 पोस्टचा अभ्यास केला आहे. यांच्या पोस्टचा एका विशिष्ट कारणासाठी अभ्यास करण्यात आला आहे. याचं कारण असं की या युझर्सनी सबरेडिट पोस्ट r/breakups वर पोस्ट केलं होतं. याचा अर्थ की या लोकांचे ब्रेकअप होत आहे किंवा होणार आहे. परंतु येथे प्रश्न ब्रेकअप होणार आहे की होईल असा नसून ज्या पद्धतीनं या पोस्ट केल्या आहेत त्याचा मुद्दा आहे. या संशोधनाचा रिपोर्ट प्रोसिडिंग्स ऑफ नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित झाला आहे. 

हेही वाचा - Bra Fence: येथे आल्यावर तरुणी स्वतः का उतरवतात त्यांची अंतर्वस्त्र? कारण वाचून बसेल धक्का

कसं कळणार आपलं BreakUp? 

या रिसर्चमध्ये ब्रेकअपच्या दोन वर्षाआधीचे आणि ब्रेकअपच्या दोन वर्षांनंतरचे युझर्सचे पोस्ट वाचण्यात आले आहेत. तर या संशोधकांना या पोस्टमध्ये खूप बदलं पाहायला मिळाला आणि खासकरून त्यांच्या भाषांमध्ये होता. म्हणजे पोस्ट्समध्ये ब्रेकअप आधी केलेली पोस्ट आणि ब्रेकअपनंतर केलेली पोस्ट यामध्ये खूपच मोठा फरक असल्याचे संशोधनकांना जाणवलं आहे. त्यात त्यांना हेही जाणवलं की ब्रेकअपच्या सहा महिन्यांनंतर त्यांच्या पोस्टमध्ये फारसा काहीच बदल होत नव्हता परंतु ब्रेकअपच्या तीन महिन्यांअगोदरच त्यांच्या भाषेत आणि पोस्टमध्ये लक्षणीय बदल करण्यात आला होता. 

भाषा कशी करते मदत? 

आपली भाषा अनेकदा आपली मन:स्थिती काय आहे त्याचबरोबर आपली भाषा कशी बदलते हे दर्शवते. तेव्हा अशावेळी आपली भाषा खूप औपचारिक झालेली असते आणि त्यामुळे आपणही खूप जास्त हळवे होतो.