पीएफधारकांसाठी महत्त्वाची बातमी, चुकूनही करू नका ही माहिती शेअर, नाहीतर.........

जर तुम्ही ही माहिती कुठे शेअर केलीत किंवा तसा खोटा फोन आला तर तुम्ही सावध राहा नाहीतर तुमचे पैसे तूम्ही गमवाल. 

Updated: Aug 20, 2022, 08:44 PM IST
 पीएफधारकांसाठी महत्त्वाची बातमी, चुकूनही करू नका ही माहिती शेअर, नाहीतर......... title=

EPFO Account Update : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) सर्व वापरकर्त्यांसाठी ट्विट करून एक अलर्ट जारी केला आहे. EPFO ने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, कोणत्याही खातेधारकाने चुकूनही खात्याशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये. जर EPFO खात्याची माहिती फसवणूक करणाऱ्यांच्या हाती लागली तर ते तुमच्या खात्यातून पैसे धोक्यात येऊ शकतात. EPFO कधीही आधार, पॅन, UAN, बँक तपशीलांची माहिती आपल्या खातेधारकांकडून घेत नाही. 

EPFO ने ट्विटमध्ये लिहिले आहे की, EPFO कधीही कोणत्याही सेवेसाठी व्हॉट्सअॅप, सोशल मीडिया इत्यादीद्वारे कोणतीही रक्कम जमा करण्यास सांगत नाही. पीएफ खातेधारक चुकूनही खात्यामध्ये समाविष्ट असलेल्या आवश्यक माहितीमध्ये पॅन क्रमांक, आधार क्रमांक, यूएएन आणि तुमचा पीएफ खाते क्रमांक शेअर करत नाहीत. जर तुम्ही ही माहिती कुठे शेअर केलीत किंवा तसा खोटा फोन आला तर तुम्ही सावध राहा नाहीतर तुमचे पैसे तूम्ही गमवाल. 

अकांऊट सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही काय कराल? - तुमचे वैयक्तिक तपशील मागवण्यासाठी जर तुम्हाला कुठलाही अज्ञात कॉल येत असेल अगदी फिशिंग कॉल किंवा मेसेज येत असेल तर त्याविरुद्ध ताबडतोब पोलिसांकडे तक्रार नोंदवणे आवश्यक आहे. तुमची महत्त्वाची कागदपत्रे जसे की PAN, UAN आणि EPFO ​​पासवर्ड इत्यादी शेअर करणे कटाक्षाने टाळा तसेच तुमचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड माहिती इत्यादी कोणासोबत शेअर करू नका आणि तुमची वैयक्तिक माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करू नका.