माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांची प्रकृती चिंताजनक

माजी राज्यपाल, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी यांना बुधवारी पक्षाघाताचा झटका आला. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.  त्यांना नवी दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 20, 2017, 07:34 PM IST
माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांची प्रकृती चिंताजनक title=

नवी दिल्ली : माजी राज्यपाल, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी यांना बुधवारी पक्षाघाताचा झटका आला. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.  त्यांना नवी दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. 

एन. डी. तिवारी ९१ वर्षांचे आहेत. त्यांना आज पक्षाघाताचा झटका आला. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, तिवारी यांना सकाळपासूनच अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर ते बेशुद्ध पडले. त्यांना तात्काळ मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मार्च २०१४ मध्ये नारायण दत्त तिवारींनी रोहित शेखर यांचा मुलगा म्हणून त्याला नाव दिले होते. रोहितला त्याच्या वडिलांचे नाव मिळविण्यासाठी सहा वर्षांपर्यंत कायदेशीर लढाई लढवावी लागली. सर्व कायदेशीर घोटाळ्यानंतर तिवारी यांना डीएनए चाचणी करावी लागली. यात असे सिद्ध झाले की, तिवारी हे रोहित शेखर यांचे वडील होते. तिवारी यांनी त्यानंतर रोहितची आई उज्ज्वला शर्मा यांच्याशी विवाह केला. रोहित हा भाजपचा नेता आहे. मात्र, तिवारी हे कॉंग्रेसमध्येच आहेत.