तुमच्याकडे आहे का 'या' नंबरची नोट, तर तुम्हीही लखपती बनू शकता

पैसा वाढवण्यासाठी शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याने अनेकांजवळ उत्पनाचा नवीन स्त्रोत निर्माण होऊ लागला आहेत. अशाच एका उत्पनाचा स्त्रोत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  

Updated: May 23, 2022, 03:44 PM IST
तुमच्याकडे आहे का 'या' नंबरची नोट, तर तुम्हीही लखपती बनू शकता title=

मुंबई : कोरोनानंतर देशात एक वेगळी अर्थक्रांती आली आहे.जॉब करणारी माणस फक्त जॉबचं करत नाहीत, तर आता पैसा वाढवण्यासाठी शेअर मार्केटमध्ये गुंतवू लागली आहेत. सोप्या शब्दात म्हणायचं झाले तर पैशाला कामाला लावू लागले आहेत. त्यामुळे त्यांच्याजवळ उत्पनाचा नवीन स्त्रोत निर्माण होऊ लागला आहेत. अशाच एका उत्पनाचा स्त्रोत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  

अनेक लोकांना जुन्या आणि दुर्मिळ नोटा अथवा 789 अशा लकी नंबरच्या नोटा व कॉईन्स जमवण्याचा छंद असतो. त्यामुळे या व्यक्तींकडे अशा या नोटा आणि कॉईन्सचा मोठा साठा असतो. हा त्यांचा छंद त्यांना लखपती बनवू शकतो. 
 
जर तुमच्याकडे जुनी आणि दुर्मिळ नाणी आणि नोटा असतील तर तुम्ही ऑनलाइन नोटा विकून सोप्या पद्धतीने पैसे कमवू शकता. 
उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे 1, 5, 10, 20, 50 किंवा 100 किंवा 2000 च्या शेवटच्या क्रमांकाची 786 ची नोट असेल तर तुम्ही घरी बसून लाखो रुपये कमवू शकता. कारण या नोटांना बाजारात खूप मागणी आहे. या नोटा कशा विकता येईल यासाठी खालील गोष्टी फॉलो करा.  

असे विकता येतील पैसे 

  • www.ebay.com या वेबसाईटवर जा. 
  •  वेबसाइटवर 'विक्रेता' म्हणून स्वतःची नोंदणी करा. जर तुम्ही आधीच नोंदणीकृत असाल, तर तुम्ही थेट लॉग इन करू शकता.
  • लॉग इन झाल्यावर तुम्हाला तुमच्या नोटांचे स्पष्ट चित्र अपलोड करावे लागेल. जेणेकरून तुमची नोट खरी आहे याची खात्री होईल. 
  • नंतर तुम्हाला नोट विकायची आहे ती किंमतही तुम्हाला सेट करावी लागेल. 
  • एकदा तुम्ही लॉग इन केल्यावर अनेक लोक तुमच्याशी संपर्क साधू साधतील.
  • तुमची नाणी तुम्हाला पाहिजे त्या किंमतीला विकण्यासाठी तुम्ही खरेदीदारांशी वाटाघाटी करू शकता.