ट्रॅक्टर नदीत कोसळून ७ ऊसतोड कामगारांचा मृत्यू

 ट्रॅक्टरच्या अपघातात ७ जण ठार झाल्याचे दुर्दैवी घटना घडली आहे.  

Updated: Feb 8, 2020, 10:16 PM IST
ट्रॅक्टर नदीत कोसळून ७ ऊसतोड कामगारांचा मृत्यू  title=

बेळगाव : ट्रॅक्टरच्या अपघातात ७ जण ठार झाल्याचे दुर्दैवी घटना घडली आहे. खानापूर तालुक्यातील बोगुर गावाजवळची घटना ही घटना घडली असून या अपघतात सात ऊसतोड मजूर जागीच ठार झालेत. ट्रॅक्टर नदीत कोसळून हा अपघात झाला. या अपघातात १५ जण गंभीर जखमी झालेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीपैकी दहा जणांची प्रकृती गंभीर आहे.

या अपघातात ठार झालेले सर्व बोगुर गावचे राहणारे आहेत. ट्रॅक्टर चालकाच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात झाल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. ऊसतोड करणारे कामगार ट्रॅक्टरमधून इटगी गावनजीक आले होते. त्यावेळी चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. अपघाताचे वृत्त समजतात स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली.