नवी दिल्ली : जगातील सात आजूबे पर्यटकांना आता एकाच ठिकाणी अनूभवता येणार आहेत. ६० फूट उंचीचा एफिल टॉवर, २० फूट उंचीचा ताजमहाल त्याचप्रमाणे अन्य सात अजूबे एकाच ठिकाणी साकारणायात आले आहेत. दक्षिण दिल्लीतील नगर निगम भागात औद्योगिक आणि अन्य क्षेत्रातील १५० टन कचऱ्यापासून या आश्चर्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत.
गृह मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. राजीव गांधी स्मृती वनातील ७ एकर जागेत 'वेस्ट टू वंडर पार्क' उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. शूक्रवारपासून हे उद्यान पर्यटकांसाठी खूले करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी जगातील सात आश्चर्य एकाच ठिकाणी पाहण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी केली. पहिल्याच दिवशी २ हजार पर्यटकांनी हजेरी लावल्याचे एसडीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणने आहे.
तब्बल ७ कोटी रूपयांमध्ये उभा राहिलेला 'वेस्ट टू वंडर पार्क' पर्यटकांसाठी सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत खूला असणार आहे. 'वेस्ट टू वंडर पार्क' मध्ये २० फूट उंचीचा ताजमहाल, ग्रेट पिरॅमिड ऑफ गिझाची १८ फूट उंचीची प्रतिकृती, ६० फूट उंचीचा एफिल टॉवर, क्राइस्ट द रिडीमरची २५ फूट उंच प्रतिकृती, रोमच्या कोलोसियमची १५ फूट, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची ३० फूट उंचीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या सात आश्चर्यांच्या प्रतिकृती नट, सायकल, जूनी भांडी ऑटोमोबाईलचे जूने भाग, आणि खराब लोखंडापासून 'वेस्ट टू वंडर पार्क' ची निर्मिती करण्यात आली आहे. हे सात आश्चर्य पाहण्यासाठी नागरिकांना ५० रूपये, ३ ते १२ वयोगटातील मुलांनासाठी २५ रूपये मोजावे लागणार आहेत तर जेष्ठ नागरिकांसाठी प्रवेश नि:शूल्क असणार आहे.