मोठी बातमी : शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव

UPA President :शरद पवार यांची यूपीएच्या अध्यक्षपदी निवड करण्याची मागणी

Updated: Mar 29, 2022, 05:34 PM IST
मोठी बातमी : शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव title=

नवी दिल्ली : दिल्लीत आयोजित राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत शरद पवार यांना युपीए अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडला गेला आहे. राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची यूपीएच्या चेअरमनपदी (UPA chairman) निवड करण्याची मागणी याआधीही झाली होती. त्यामुळे पवार यूपीएचे अध्यक्ष होणार का अशी पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

महाविकासआघाडीचा प्रयोग राज्यात यशस्वी केल्यानंतर शरद पवार यांची यूपीएच्या अध्यक्षपदी निवड करण्याची मागणी याआधी ही अनेकदा झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर भाजप विरोधात  विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र आता याकडे काँग्रेस आणि इतर विरोधीपक्ष काय प्रतक्रिया देतात याकडे ही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शरद पवार यूपीए अध्यक्ष होतील, अशी चर्चा याआधी ही होत होती. पण राष्ट्रवादीकडूनच त्याला पूर्णविराम देण्यात आला होता. पण आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत हा प्रस्ताव आल्याने शरद पवार यावर काय प्रतिक्रिया देतात हे देखील पाहावं लागणार आहे.

संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) चं नेतृत्व आतापर्यंत काँग्रेसकडेच राहिलं आहे. 2004 च्या लोकसभा निवडणुकीनंतर सोनिया गांधी यांनी विविध जकीय पक्षांना एकत्र घेऊन यूपीएची स्थापना केली होती.

सोनिया गांधी यांच्यानंतर यूपीएमध्ये शरद पवार हे वजनदार नाव मानलं जातं. यूपीएमधील इतर पक्ष आता यावर काय निर्णय घेतात याकडे देशातील लोकांचं लक्ष लागलं आहे.