नवी दिल्ली : बिहारमध्ये महाआघाडी सरकारमधून वेगळे होऊन भाजपसोबत सरकार बनविण्याच्या जेडीयूच्या निर्णयाशी नाराज असलेले पक्षाचे वरिष्ठ नेते येत्या काही दिवसात नवा पक्ष काढण्याच्या तयारीत आहेत.
मीडियातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नितीश कुमार यांनी भाजपसोबत जाण्याने दुखावलेले जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांनी नवीन राजकीय पक्ष काढण्याची तयारी केली आहे. हा पक्ष काँग्रेस प्रणीत यूपीएचा हिस्सा असणार आहे.
या संदर्भात शरद यादव यांच्याशी जवळीक असलेले जेडीयू नेता विजय वर्मा यांनी सांगितले की, शरद यादव यांनी या संदर्भात बिहार राज्यातील युनिटमधील काही पदाधिकाऱ्यांशी बोलणी केली आहे.
विजय वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार या आठवड्याच्या शेवटी नव्या पक्षाची शरद यादव घोषणा करू शकतात. या संदर्भात नितीश कुमार गटातील संजय सिंह यांनी यापूर्वी सांगितले होते, की शरद जी आमचे वरिष्ठ नेता आहेत. त्यांना वेगळ्या मार्गाने जायचे असेल तर ते तसे करण्यासाठी स्वतंत्र आहेत.