Integrated Industries Ltd Share Price: आर्थिक उलाढालींच्या विश्वात शेअर बाजारात (Share Market) होणाऱ्या प्रत्येक हालचालीचा कमीजास्त प्रमाणात सर्वसामान्यांच्या पैशांवरही परिणाम होत असतो. यामध्ये गुंतवणूकदारांवर थेट परिणाम होत असतानाच गुंतवणूक न केलेल्यांनाही हे बदल कमीजास्त प्रमाणात शेकतात. सध्याच्या घडीला अतिप्रचंड वेगानं आर्थिक उलाढाली होणाऱ्या याच शेअर बाजारात गेल्या काही काळापासून अनेक कंपन्या गुंतवणूकदारांना दणकून परतावा देताना दिसत आहेत.
आश्चर्याची बाब म्हणजे अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांनी अवघ्या 6 महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांना दुपटीनं परतावा दिला आहे. अशाच एका शेअरची सध्या चर्चा सुरु असून, या शेअरनं अवघ्या चार वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना कोट्यवधींचं मालक केलं. या शेअरचं नाव आहे Integrated Industries Ltd.
इंटीग्रेटेड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरमुळं वर्षभरात गुंतवणूकदारांना तब्बल 1845.02 टक्के निव्वळ नफा मिळवून दिला आहे. वर्षभरापूर्वी या शेअरची किंमत 33.80 रुपये इतकी होती. ज्यानंतर एका वर्षात हा शेअर 621.25 रुपयांनी वाढून थेट 655.05 च्या स्तरावर पोहोचला. जाणून आश्चर्य वाटेल किंवा विश्वासही बसणार नाही, पण 29 मार्च 2019 मध्ये या एका शेअरची किंमत 1.46 रुपये इतकी होती. पुढच्याच पाच वर्षांमध्ये या कंपनीच्या शेअरनं गुंतवणूकताचांना 44,766.44 टक्क्यांचा परतावा मिळवून दिला.
तुम्हीही या गुंतवणुकीला हुकलात? एखाद्या गुंतवणूकदारानं या शेअरमध्ये किमान 10 हजारांची गुंतवणूक केली असती तर आता त्यांना 44,76,600 रुपये इतका परतावा मिळाला असता. 1 लाखांची गुंतवणूक केली असती तर, नफा कोट्यवधींच्या घरात असता. आहे की नाही कमाल?
सदर कंपनी फूड मॅन्युफॅक्चरिंग आणि फूड प्रोडक्ट ट्रेडिंग अर्थात खाद्यपदार्थ विक्री आणि खाद्यपदार्थ निर्मितीच्या व्यवसायात सक्रिय आहे. या कंपनीकडून दोन मुख्य विभागांवर लक्ष केंद्रीत केलं जातं. कंपनीकडून फूड मॅन्युफॅक्चरिंगचं काम सहकारी कंपनी Nurture Well Foods Pvt. Ltd च्या वतीनं केलं जातं.
(वरील माहिती शेअरच्या कामगिरीच्या आधारे मिळाली असून, हा गुंतवणुकीसाठीचा सल्ला समजू नये. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांची मदत नक्की घ्या. )