Share Mraket Holiday: देशांतर्गत बाजारात ऑगस्टमध्ये शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी नुकतीच समोर आली आहे. भारतीय शेअर बाजारातील साप्ताहिक सुट्टीव्यतिरिक्त या महिन्यात 3 दिवस शेअर बाजारातील कामकाजही ठप्प राहणार आहे. म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये कोणताही व्यवहार या 3 दिवसांत होणार नाही आहे.
ऑगस्ट महिना हा सुट्ट्यांसाठी खास असतो. यावर्षी या महिन्यात रक्षाबंधन ते 15 ऑगस्टपर्यंत अनेक सण आहेत. त्यामुळे या महिन्यातही शेअर बाजारात अनेक दिवस ही सुटी राहणार आहे.
पाहा शेअर बाजारातील सुट्ट्या -
ऑगस्ट 2022 मध्ये BSE आणि NSE वरील ट्रेडिंग तीन दिवसांसाठी बंद राहील - 9 ऑगस्ट, 15 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट. 9 ऑगस्ट 2022 रोजी मोहरम असल्याने दलाल स्ट्रीटवर कोणतेही व्यवहार होणार नाहीत. याशिवाय 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त बाजारपेठ बंद राहणार आहे. महिन्याच्या शेवटी 31 ऑगस्टला गणेश चतुर्थी आल्याने शेअर बाजार बंद राहणार आहे. ऑगस्टमध्ये अनेक मोठे उत्सव होतात. उदाहरणार्थ, मोहरम, रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, कृष्ण जन्माष्टमी आणि गणेश चतुर्थी असे अनेक सण आहेत ज्यामुळे बँकाही बंद राहतील.
जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल तर तुम्ही BSE ची अधिकृत वेबसाइट - bseindia.com वर स्टॉक मार्केट हॉलिडे 2022 ची संपूर्ण यादी तपासू शकता. ऑगस्ट 2022 मध्ये या तीन दिवसांमध्ये equity department, equity derivative segment आणि SLB segment मध्ये खरेदी/विक्री होणार नाही, म्हणजेच बाजारपेठे ही संपूर्ण बंद राहणार आहे.
स्टॉक मार्केट ऑगस्ट 2022 च्या सुट्ट्यांच्या यादीनुसार 9 आणि 31 तारखेला संध्याकाळी उघडेल. commodity market 15 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी आणि संध्याकाळी बंद राहणार आहे.
पुढे कशी राहील सुट्टी...
याशिवाय 31 ऑगस्ट 2022 नंतर शेअर बाजाराची पुढील सुट्टी 5 ऑक्टोबर 2022 रोजी दसरा सणानिमित्त असेल. यानंतर 24 ऑक्टोबर 2022 आणि 26 ऑक्टोबर 2022 रोजी दिवाळी आणि बलिप्रतिपदेच्या निमित्ताने सुट्टी असेल.