Snake Video: साप नुसतं नाव जरी काढलं तरी अंगाचा थरकाप उडतो. आपल्या आजूबाजूला कुठे साप आहे असं जरी नुसतं कोणी बोललं तरी पाळता भुई कामी पडते, इतके आपण सापाला घाबरतो. या जगात सापाच्या जवळपास ३000 प्रजाती (total snake in world) आहेत. त्यातले काही प्रजाती या अतिशय धोकादायक असतात. अत्यंत विषारी सापाने दंश केला की, जागीच प्राण गेलाच म्हणून समजा. म्हणूनच आपण सापाला घाबरतो. आपल्या पुढ्यात आलेला साप हा विषारी (poisonious snake) आहे कि बिनविषारी आपण सांगू शकत नाही. करणं शेवटी जीव प्रत्येकालाच प्रिय असतो.
आपण सोशल मीडियावर (social media) अनेक व्हिडीओ जे व्हायरल (viral video) होतात ते पाहत असतो, सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ पसरत असतात. त्यातले काही व्हिडीओ प्राण्यांचे असतात तर काही मजेशीर क्लिप्स असतात. एखादा व्हिडीओ खूपच आवडला तर लोक तो शेअर करतात, आणि रातोरात तो व्हिडीओ खूप प्रसिद्ध होऊन जातो.
असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांची झोप उडवत आहे, आणि हा व्हिडीओ आहे सापांचा किंग कोब्राचा. (king cobra shocking viral video) किंग कोब्रा हा सापांच्या प्रजातींमधील सर्वात विषारी आणि धोकादायक प्रजात म्हणून ओळखला जातो, आणि म्हणूनच त्याला किंग कोब्रा म्हणतात.
सध्या जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे तो पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या व्हिडिओमध्ये आपण पाहतो एक किंग कोब्रा आपलं संपूर्ण शरीर हवेत उचलून पुढे काय चाललंय हे पोहण्याचा प्रयत्न करत आहे.
म्हणजे अक्षरशः तो साप उभा आहे कि काय असाच जणू भास होतं आहे. हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला असून आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. आणि लेको व्युज या व्हिडिओला मिळाले आहेत.
The king cobra can literally "stand up" and look at a full-grown person in the eye. When confronted, they can lift up to a third of its body off the ground. pic.twitter.com/g93Iw2WzRo
— Susanta Nanda (@susantananda3) February 27, 2023
हा व्हिडीओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विट केला आहे. ट्विट करताच या व्हिडिओला प्रचंड लाईक्स मिळाले आहेत