Cooking Tips : काय म्हणता ? भजी बनवा तेही बेसन न वापरता !

Cooking Tips : किचनमध्ये काम करणं वाटतं तितकं सोप्प नाहीये, बऱ्याचदा बेत फसतो आणि पंचाईत होते पण अशावेळी स्मार्ट पद्धतीने परिस्थिती हाताळणारी गृहिणी ठरते स्मार्ट गृहिणी 

Updated: Mar 1, 2023, 06:15 PM IST
Cooking Tips : काय म्हणता ? भजी बनवा तेही बेसन न वापरता !  title=

Cooking Tips : चहा आणि गरमागरम कांदा भजी म्हणजे अहाहा! पर्वणीच जणू. आपल्यापैकी बरीच मंडळी आहेत ज्यांना भजी खाणं अत्यंत आवडत. बरं भजी बनवणं तास काही फार अवघड काम नाहीये. भजी बनवण्यासाठी काही ठराविक सामान लागत त्यात काही फार साहित्याची गरज भासत नाही. त्यामुळे कामी साहित्यात पटकन होणार असा हा पदार्थ. (Smart cooking tips and tricks ) लहान असो वा मोठे कांदा भजी (kanda bhaji) सर्वांना खूप आवडतात.  बरं भजी बनवण्याचा मूड झाला तर घरी काही बेसिक (basic ingredients) गोष्टी असणं महत्वाचं असतं जस कि कांदा, (onion) मिरची, (chilli) मसाले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बेसनाचं पीठ..पण अनेकवेळा असं होतं कि भजी बनवण्याचा प्लॅन आखला जातो पण नेमकं घरात बेसन संपलेलं असतं मग अश्या वेळी काय करायचं हा प्रश्न समोर उभा राहतो... (Smart cooking tips and tricks )

पण  बेसनच नाही तर भजी बनवणारच कशी ? मग प्लॅन कॅन्सल ! पण एक मिनिट जर आम्ही तुम्हाला सांगितलं कि आता बेसनाशिवाय कांदा भजी किंवा कोणतेही पकोडे तुम्ही करू शकता तर?  आश्चर्य वाटलं ना पण अहो ही अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा आता शक्य आहे.  अश्यावेळी इन्स्टंट बेसन तयार करून तुम्ही भाजी बनवू शकता याशिवाय अनेक बरेच स्मार्ट किचन hack आहेत जे वापरून तुम्ही हटके कूकिंग करू शकता..  (smart kitchen hacks )

चला तर मग जाणून घेऊया अश्याच काही बेस्ट आणि हटके कुकिंग टिप्स विषयी ..  (cooking tips)

बेसनाशिवाय बनवा चटपटीत भजी..फक्त या गोष्टीचा करा वापर

जर बेसन नहिये आणि भजी बनवण्याचा बेत आखताय तर चण्याची डाळ पिसून त्यापासून पकोडे (pakoda) तळू शकता, डाळ जर आधीच भिजून ठेवलीत तर आणखी सॉफ्ट (soft) होईल बेकिंग सोडा (baking soda) घालून 10-15 मिनिटं ठेवलीत तर डाळ व्यवस्थित पिसली जाईल.. आणि कुठलीही भेसळ न करता घरी बनवल्यामुळे याची भजी आणखी चविष्ठ होतील.  (how to make pakora bhaji kanda bhaji without besan cooking hacks and tricks )

डाळ बनवा आणखी टेस्टी 

बरं वरण किंवा डाळ आवडत नाही अशीही काही मंडळी आहेत अश्यावेळी डाळीची रेसिपी बदलून थोडीशी वेगळी करून आणखी टेस्टी करू शकता... डाळ  फ्राय (dal fry) बनवताना कांदा आणि टोमॅटो (tomatto) कापून ते तळून घ्या  त्यात लाल मिरची तळून घ्या थोडा गरम मसाला घाला याने रोजची प्लेन डाळ कमाल चवदार होईल आणि सर्वाना खूप आवडेल. 

खीर खा बिनधास्त 

जास्त साखर खाणे शरीरासाठी नुकसानदायी असू शकत.. (sugar harmfull to body ) जर तुम्हाला खीर खायची आहे  पण त्याचसोबत तब्ब्येतसुद्धा जपायचेय  तर  खिरीमध्ये साखरेऐवजी तुम्ही गूळ घालू शकता.. (jeggery kheer) गूळ घातल्याने खिरीचा स्वादही सुंदर होईल त्याचशिवाय शरीरासाठी काही अपायकारक सुद्धा नसेल... (jeggery health benefits)

भात बनवा आणखी टेस्टी 

भात बनवणं सर्वात सोपं वाटत असेल पण  परफेक्ट भात बनवणं हि सुद्धा एक कला आहे. भट बनवताना जर चिकटत असेल तर त्यात थोडं लिंबू आणि तूप घालावं यामुळे भात सुटत होतो आणि खाण्यासाठी चवसुद्धा चांगली लागते..  (lemon in rice, ghee in rice)

अश्याच बऱ्याच किचन टिप्स असतात  नसतील पण त्या वापरून आपण सर्वांची वाहवा मिळवू शकतो.. आणि उत्तम स्वयंपाक करू शकतो. (smart kitchen tips and tricks )