धावत्या कारमध्ये मालकाकडून बलात्कार, ड्रायव्हर चालवत राहिला कार

धक्कादायक प्रकार उघडकीस 

Updated: Feb 23, 2021, 11:42 AM IST
धावत्या कारमध्ये मालकाकडून बलात्कार, ड्रायव्हर चालवत राहिला कार

मुंबई : मध्यप्रदेशमध्ये (Madhya Pradesh)  ग्वालियर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका महिलेने कार मालकावर आणि कार चालकावर धक्कादायक आरोप लावले आहेत. एका व्यक्तीने एका महिलेला कामासंदर्भात बोलायचं आहे, असं सांगून गाडीत बसवलं. महिलेचा गैर फायदा घेत त्याने कारमध्ये महिलेवर बलात्कार केला. एवढंच नव्हे तर हॉटेलमध्ये महिलेला घेऊन जाऊनही रेप केला. 

ग्वालियर जिल्ह्यातील ग्राम कुलैथयेथील महिलेसोबत ही दुष्कर्म केलं आहे. या महिलेने कार मालकावर बलात्काराचा आरोप केला असून कार चालकावर त्याला मदत केल्याचा आरोप केला आहे. 

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, रामबाबू गुर्जर फॅक्टरीत काम करण्याचा हेतूने महिलेला कारमध्ये बसवलं. चालत्या तवेरा कारमध्ये महिलेवर बलात्कार करण्यात आला. या दरम्यान कार चालक गाडी चालवतच राहिला. त्यानंतर महिलेला जबरदस्ती हॉटेलमध्ये नेण्यात आलं आणि तेथे तिच्यावर बलात्कार करण्यात आले. 

महिलेने संपूर्ण घटना पोलिसांना सांगून दोघांविरोधात तक्रार केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी रामबाबू गुर्जर आणि कार चालकाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने सोमवारी तक्रार नोंदवली आहे.